Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॅपर बादशाहच्या सासूने जावयाला दिले शिव्याश्राप? म्हणाली ‘देव तुमचं मरणंही करेल…’, सोशल मीडियावर केली खोचक पोस्ट

रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. ईशाने भीती, शांतता आणि धैर्याविषयी सूचक पोस्ट शेअर केल्यानंतर तिची आई पूनम रिखी यांनीही कर्म आणि न्यायावर आधारित दोन पोस्ट शेअर केल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 29, 2026 | 04:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर जोर आला आहे. ईशाने नुकतीच भीती, शांतता आणि धैर्य याविषयी सूचक पोस्ट शेअर केल्यानंतर आता तिची आई पूनम रिखी यांनीही कर्म आणि न्यायावर आधारित काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये बादशाहचं नाव कुठेही नसले, तरी त्या नेमक्या या घडामोडींनंतर आल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Kriti Sanon On Allu Arjun: अल्लू अर्जुनसोबत काम करण्याचं कृती सेननचं स्वप्न; अभिनेत्रीने पहिल्यांदाच व्यक्त केली मनातील इच्छा

पूनम रिखी यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर भगवान शंकराची प्रार्थना करणाऱ्या महिलेचा फोटो शेअर करत लिहिलं, “कर्म परत येतंच. जर तुम्ही एखाद्याचं आयुष्य कठीण केलं असेल, तर देव तुमचं मरणही कठीण करेल.” दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी, “कर्म कधीच माफ करत नाही. जर तुम्ही कोणाला रडवलं असेल, तर एक दिवस तुम्हालाही अश्रू ढाळावे लागतील. देव माफ करू शकतो, पण कर्म कधीच माफ करत नाही,” असा संदेश दिला.

दरम्यान, ईशा रिखीनेही तिच्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव न घेता दीर्घकाळ भीतीपोटी शांत राहिल्याचं सांगितलं. “माझी शांतता म्हणजे स्वीकार नव्हता, तर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता. आता मी भीतीऐवजी धैर्याची निवड करत आहे. संपूर्ण सत्य सांगण्याची वेळ अजून आलेली नसली, तरी सर्व काही ठीक असल्याचं भासवणं मी थांबवत आहे,” असं तिने लिहिलं.

याआधी ईशाने बादशाहसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, “प्रत्येक वादळ एक धडा असतो, प्रत्येक प्रार्थना एक आशा असते,” असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, बादशाह किंवा ईशा या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Anup Jalota Birthday : ७२व्या वाढदिवसानिमित्त अनुप जलोटांच्या घरी रंगली सुरांची मैफल; संगीत क्षेत्रातील दिग्गजांची खास उपस्थिती

बादशाह याचं यापूर्वी जॅस्मिन मसीह हिच्याशी २०१२ मध्ये लग्न झालं होतं. २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना जेस्सेमी ग्रेस मसीह सिंग ही मुलगी असून दोघे मिळून तिचा सांभाळ करत आहेत. त्यानंतर बादशाह आणि ईशा रिखी यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. सध्या सोशल मीडियावरील या पोस्टमुळे त्यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या सर्व पोस्टचा संबंध बादशाहशीच आहे, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Web Title: Badshah mother in law posted post for her son in law on karma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Divorce
  • rapper Badshah

संबंधित बातम्या

‘पतीला घाबरून गप्प राहिले…’, बादशाहच्या दुसऱ्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ
1

‘पतीला घाबरून गप्प राहिले…’, बादशाहच्या दुसऱ्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये
2

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये

चार महिनो का प्यार ओ रब्बा? लग्नाच्या चार महिन्यातच Badshah च्या संसारात दुरावा; पत्नीने केली पोस्ट, चर्चेला उधाण
3

चार महिनो का प्यार ओ रब्बा? लग्नाच्या चार महिन्यातच Badshah च्या संसारात दुरावा; पत्नीने केली पोस्ट, चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.