
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
2026 मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘भूत बंगला’ सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. तब्बल 14 वर्षांनंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही हिट जोडी पुन्हा एकत्र येत असल्याने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘हेरा फेरी’, ‘भूल भुलैया’सारख्या कल्ट कॉमेडी चित्रपटांमुळे प्रसिद्ध असलेल्या या जोडीने यावेळी हॉरर-कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची तयारी केली आहे.
बालाजी मोशन पिक्चर्सच्या पाठबळामुळे ‘भूत बंगला’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. या उत्सुकतेला अधिक उंची देत मेकर्सनी नुकतेच ‘तू ही दिसदा’ हे दुसरे गाणे रिलीज केले आहे. या गाण्यामुळे चित्रपटातील रोमँटिक अँगलची झलक पाहायला मिळत असून, प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
रणवीर सिंहच्या अभिनयावर Ram Gopal Varma फिदा; ‘धुरंधर २’मधील परफॉर्मन्सला म्हटले ‘सर्वात प्रभावी’
याआधी रिलीज झालेल्या ‘राम जी आके भला करेंगे’ या गाण्यानंतर ‘तू ही दिसदा’मध्ये अक्षय कुमार आणि वामिका गब्बी यांची केमिस्ट्री पाहायला मिळते. निसर्गरम्य लोकेशन्स, हिरवीगार दऱ्या, झरे आणि डोंगररांगा यामध्ये चित्रित करण्यात आलेले हे गाणे प्रेक्षकांना एक शांत, सुंदर आणि रोमँटिक अनुभव देते. ‘समर लव्ह’ची भावना व्यक्त करणारे हे कूल आणि ब्रीजी गाणे प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे ठरत आहे.
या गाण्याला अरिजीत सिंह आणि निखिता गांधी यांच्या सुरेल आवाजाची जोड लाभली आहे. त्यांच्या रूहानी गायकीमुळे गाण्याला एक वेगळीच भावनिक खोली मिळते. संगीत, लोकेशन्स आणि सादरीकरण या सर्वांचा उत्कृष्ट मेळ या गाण्यात पाहायला मिळतो. प्रियदर्शन यांच्या सिग्नेचर स्टोरीटेलिंगची झलक या गाण्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते, ज्यामुळे ते अधिक खास बनते.
‘Sakhe Ga Sajani’चा ट्रेलर रिलीज; मैत्री आणि प्रवासाची भावनिक कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला
याआधी ‘भूत बंगला’चा टीझरही रिलीज करण्यात आला होता, ज्याला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या पुनरागमनामुळे या चित्रपटाबद्दलची अपेक्षा आणखी वाढली आहे. एकूणच, ‘भूत बंगला’ हा चित्रपट हॉरर, कॉमेडी आणि रोमँस यांचा सुरेख संगम घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. दमदार स्टारकास्ट, आकर्षक संगीत आणि मनोरंजक कथानक यांच्या जोरावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.