Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Sakhe Ga Sajani’चा ट्रेलर रिलीज; मैत्री आणि प्रवासाची भावनिक कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला

‘सखे गं साजणी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. आणि प्रेक्षक आता हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2026 | 02:56 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Sakhe Ga Sajani’चा ट्रेलर रिलीज
  • मैत्री आणि प्रवासाची भावनिक कथा
  • ‘सखे गं साजणी’ कधी होणार प्रदर्शित?
 

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री, प्रवास आणि आयुष्यातील खास क्षणांची नवी कहाणी घेऊन येणाऱ्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला असून, तो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. मित्रांसोबतच्या प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट मराठी सिनेमात एक ताजातवाना आणि वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे.

ट्रेलरमध्ये तीन जिवलग मित्रांच्या प्रवासाची, त्यांच्या नात्यांची आणि आयुष्यातील भावनिक वळणांची सुंदर झलक पाहायला मिळते. या प्रवासात मजा, साहस, आठवणी आणि भावनिक क्षणांचा सुरेख संगम दाखवण्यात आला आहे. त्यामुळेच हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, प्रत्येकाच्या आयुष्यातील मैत्रीची खास जागा अधोरेखित करणारा ठरतो.

रॅपर Badshah ने गुपचूप केलं दुसरं लग्न? व्हायरल फोटोने उडवली खळबळ, जाणून घ्या कोण आहे पत्नी?

चित्रपटातील गाणीही आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘सखे गं साजणी’ या शीर्षक गीताने मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार करत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. हे गाणे अभिजीत सावंत यांनी गायले असून, विजय भाटे यांच्या संगीताने आणि लखन चौधरी यांच्या शब्दांनी या गीताला एक भावनिक आणि उत्साही रंग दिला आहे.

याशिवाय ‘डीजे चा बास’ हे आणखी एक जोशपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, तेही तरुणांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. करण सावंत आणि श्वेता ठाकूर यांच्या आवाजात सादर झालेल्या या गाण्याला देखील विजय भाटे यांचे संगीत लाभले आहे, तर लखन चौधरी यांच्या शब्दांनी गाण्याला एक वेगळीच ऊर्जा दिली आहे. या दोन्ही गाण्यांमधून चित्रपटातील मैत्री, उत्साह आणि प्रवासाचा जल्लोष अनुभवायला मिळतो.

सुनील गावस्कर यांनाही मिळेना ‘धुरंधर २’ची तिकिटे; “कुठूनतरी व्यवस्था करा” म्हणत मागितली मदत

‘सखे गं साजणी’ हा चित्रपट मैत्रीच्या नात्यांवर, आयुष्यातील छोट्या-छोट्या आनंदांवर आणि प्रवासातून घडणाऱ्या आठवणींवर आधारित आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करत, प्रेक्षकांना एक भावनिक आणि आनंददायी प्रवास घडवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एकंदरीतच, ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट प्रेक्षकांना हसवणारा, रडवणारा आणि आठवणींमध्ये रमवणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मैत्री आणि प्रवासाचा सुंदर संगम अनुभवायचा असेल, तर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे.

Web Title: Sakhe ga sajani marathi movie trailer release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
1

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
2

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
3

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
4

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.