Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणवीर सिंहच्या अभिनयावर Ram Gopal Varma फिदा; ‘धुरंधर २’मधील परफॉर्मन्सला म्हटले ‘सर्वात प्रभावी’

रणवीर सिंहचा ‘धुरंधर: द रिवेंज’ सध्या चर्चेत आहे. अशातच हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. आता या चित्रपटाचे कौतुक करत राम गोपाल वर्मा यांनी देखील पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2026 | 03:32 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रणवीर सिंहच्या अभिनयाची राम गोपाल वर्माने केली प्रशंसा
  • ‘धुरंधर २’मधील परफॉर्मन्सला म्हटले ‘सर्वात प्रभावी’
  • ‘धुरंधर २’बद्दल नक्की काय म्हणाला दिग्दर्शक
 

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या रणवीर सिंहच्या दमदार अभिनयाची जोरदार चर्चा रंगली आहे. रजनीकांत, एस. एस. राजामौली, अनुपम खेर, डग्गुबाती वेंकटेश, आलिया भट्ट, आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या पाठोपाठ आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही रणवीरच्या अभिनयावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यांनी ‘धुरंधर: द रिवेंज’मधील रणवीरचा अभिनय पडद्यावर पाहिलेल्या सर्वात प्रभावी सादरीकरणांपैकी एक असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी आपले मत व्यक्त करताना रणवीरच्या अभिनयातील भावनिक खोली आणि वास्तवतेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, रणवीरच्या चेहऱ्यावर दिसणारी खरी वेदना अत्यंत दुर्मिळ आहे. त्यांनी या भावनेची तुलना हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ यांच्या ‘बॉडी ऑफ लाइज़’मधील अभिनयाशी केली. त्यांच्या मते, अशी नैसर्गिक आणि प्रभावी अभिव्यक्ती क्वचितच पाहायला मिळते.

‘Sakhe Ga Sajani’चा ट्रेलर रिलीज; मैत्री आणि प्रवासाची भावनिक कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला

यासोबतच वर्मा यांनी रणवीरच्या अभिनयातील सातत्यावरही प्रकाश टाकला. अनेक कलाकार भूमिका साकारताना केवळ बाह्य रूपात बदल करतात, मात्र रणवीरने आपल्या चेहऱ्यावरील भाव, देहबोली आणि डोळ्यांमधील भावना यामध्ये सातत्य राखत पात्राला पूर्णपणे जिवंत केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, हाच अंतर्गत बदल रणवीरला इतर कलाकारांपेक्षा वेगळा ठरवतो.

वर्मा पुढे म्हणाले की, रणवीर ज्या पद्धतीने संवाद सादर करतो, त्याची देहबोली आणि हावभाव यामधील सातत्य अत्यंत दुर्मिळ आहे. ‘धुरंधर’मधील त्याचा अभिनय त्यांनी याआधी कधीही पाहिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अशा बारकाईने अभिनय पाहणाऱ्या दिग्दर्शकाकडून मिळालेली ही प्रशंसा रणवीरच्या कामगिरीचे महत्त्व अधिक अधोरेखित करते.

रॅपर Badshah ने गुपचूप केलं दुसरं लग्न? व्हायरल फोटोने उडवली खळबळ, जाणून घ्या कोण आहे पत्नी?

दरम्यान, ‘धुरंधर: द रिवेंज’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, रणवीर सिंहने या चित्रपटाद्वारे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. बॉक्स ऑफिसवरील यशासोबतच समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. अनेकांनी त्याच्या या परफॉर्मन्सला राष्ट्रीय पुरस्काराच्या पातळीवरीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभिनय असेही म्हटले आहे. एकूणच, रणवीर सिंहचा हा अभिनय केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित न राहता, भारतीय सिनेमाच्या इतिहासात दीर्घकाळ लक्षात राहणारा ठरणार आहे. नव्या पिढीला प्रेरणा देणारी ही कामगिरी असून, त्याने देशातील सर्वोत्तम अभिनेत्यांमधील आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

Web Title: Ranveer singh dhurandhar 2 ram gopal varma praise acting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Bollywood
  • Ram Gopal Varma
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.