(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
शनिवारी, बिग बॉस १६ मधून लोकप्रिय झालेला ताजिक गायक अब्दु रोझिक याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. या बातमीने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला. आता स्वतः छोटे नवाब यांनी या व्हायरल बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी अब्दुच्या टीमने खोटे दावे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबद्दल देखील सांगितले होते. एवढेच नाही तर माहिती देताना, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे स्पष्ट करण्यात आले.
मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार, कारचा पाठलाग करत हल्ला
अब्दु रोझिकने दिली प्रतिक्रिया
अब्दु रोझिकने त्याच्या इस्टाग्राम स्टोरीवर IIIA अवॉर्ड्सचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. रेड कार्पेटवर तो असे म्हणताना दिसला आहे की, ‘देव नेहमीच योग्य व्यक्तीसोबत उभा राहतो.’ अटकेच्या बातमीवर गायकाने थेट प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु तो म्हणाला, ‘मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला दुबई खूप आवडते. मी तुमच्या सर्वांसोबत आहे. देव नेहमीच योग्य व्यक्तीसोबत आहे. मी ठीक आहे, सर्व काही ठीक आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.’ असे लिहून अब्दुने स्वतःचे मत मांडले आहे आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.
टीमने दिली प्रतिक्रिया
जेव्हा अब्दु रोझिकला चोरीच्या आरोपाखाली अटक केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एजन्सीने एस-लाइन प्रोजेक्टद्वारे एक निवेदन जारी केले ज्यामध्ये असे म्हटले होते की, ‘अब्दु रोझिकला अटक करण्यात आली नाही. तपासादरम्यान त्याला काही काळ ताब्यात ठेवण्यात आले होते. एजन्सीने मीडिया कव्हरेजबद्दल देखील चिंता व्यक्त केली आणि अब्दु रोझिकची प्रतिमा वाईट केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची योजना असल्याचे पुष्टी केली.
काय आहे ‘Babydoll Archita’ चे रहस्य? खरे प्रोफाइल की AI ची जादू, सोशल मीडियावर सुरु चर्चा!
अब्दु रोझिकच्या अटकेची बातमी का आली?
अब्दु रोझिकवर चोरीचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर त्याला दुबईमध्ये अटक करण्यात आल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तथापि, ही अटक कोणत्या चोरीसाठी करण्यात आली याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. तथापि, आता हे स्पष्ट झाले आहे की बिग बॉस फेम अब्दुला काही काळासाठीच ताब्यात घेण्यात आले होते.