(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सलमान खानचा रिऍलिटी शो ‘बिग बॉस 18’ सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. शो सुरू होऊन २ आठवडे उलटून गेले आहेत, बिग बॉस प्रेमी या शो ला चांगलेच प्रेम देत आहेत. यावेळी शोमध्ये 18 स्पर्धकांनी घरामध्ये प्रवेश केला आहे, ज्यामध्ये हेमा शर्मा गेल्या आठवड्यात पहिली एलिमेटेड स्पर्धक ठरली. अलीकडे, शोच्या निर्मात्यांना स्पर्धक अविनाश मिश्राला घराबाहेर काढण्याच्या विनंत्या येत आहेत. चाहत्यांना घरामध्ये अभिषेकला बघायची इच्छा नाही आहे.
बिग बॉस 18 च्या घरात अविनाश मिश्रा आणि अरफीन खान यांना घरातील रेशन वाटपाची जबाबदारी देण्यात आली होती पण त्यात ट्विस्ट होता. सर्व घरातील सदस्यांना एक गोष्ट नष्ट करावी लागेल ज्याची त्यांना खूप आवड आहे आणि नंतर तुरुंगात राहणारे दोन सदस्य त्या स्पर्धकाला रेशन द्यायचे की नाही हे ठरवतील. अशा परिस्थितीत अविनाश मिश्रा यांनी या कामात आपले खोटे मन दाखवत निवडक लोकांना रेशन दिले. हे बघून आता प्रेक्षक जिथे आधी अविनाशला शोमध्ये पसंत करत होते, तिथे आता त्यांना त्याचा राग येऊ लागला आहे.
हे देखील वाचा – डिंपल कपाडियाचा स्वतःच्या लेकीसोबत पोज देण्यास नकार; म्हणते,”मी ज्युनिअर्स सोबत पोज देत नाही.”
सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले की, ‘मी दिवसेंदिवस या व्यक्तीचा म्हणजेच अविनाश मिश्राचा तिरस्कार करू लागलो आहे, त्याला पाहून मला आता खूप राग येतो’. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘मनातून उतरला अविअश’. असे लिहून अनेक चाहत्यांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे. अविनाशच्या या हास्यास्पद कृतीमुळे अनेक चाहत्यांनी निर्मात्यांना ट्रोल देखील केले आहे. यावेळी रजत दलाल, मुस्कान बामणे, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना आणि नायरा बॅनर्जी यांच्या नावांचा समावेश घरातून नॉमिनेट करण्यासाठी करण्यात आला आहे.