फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री डिंपल कपाडियाने तिची मुलगी ट्वींकल कपाडियासोबत फोटो काढण्यास नकार दिला. ही बातमी, सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. डिंपल कपाडियाने स्वतःच्या मुलीसोबत फोटो काढण्यास नकार दिला तसेच ‘मी ज्युनिअर्ससोबत फोटो काढत नाही’ अशा शब्दात पापराझींना सांगितले. २३ ऑक्टोबर रोजी संध्यकाळच्या वेळी डिंपल कपाडिया यांच्या ‘गो नानी गो’ या नव्या सिनेमाच्या प्रीमियर होता. यावेळी अभिनेता अक्षय कुमार त्याची पत्नी डिंपल कपाडियासोबत उपस्थित होता. दरम्यान, रेड कार्पेटवर घडलेल्या काही घटनेमुळे या प्रसंगाने सोशल मीडियावर फार वेग धरला आहे.
हे देखील वाचा : Bigg Boss OTT 3: पायल-कृतिकानंतर अरमान मलिक करणार तिसरे लग्न? शेअर केले सोशल मीडियावर फोटो!
मुंबईमध्ये MAMI फिल्म फेस्टिवल २०२४ साजरा होत आहे. सिनेसृष्टीतील अनेक सिनेताऱ्यांच्या उपस्थितीत हा फेस्टिवल साजरा केला होत आहे. दरम्यान, रेड कार्पेटवर अभिनेत्री डिंपल कपाडिया, अभिनेता अक्षय कुमार आपली पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नासह धमाका करत असताना, पापराझी यांनी डिंपल कपाडिया यांना ट्विंकल बरोबर पोज देण्याचा आग्रह केला. यावेळी, डिंपल कपाडिया यांनी ट्विंकलसह फोटो घेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्यांच्या या कृत्याचे कारणही त्यांनी अतिशय कोमल शब्दात स्पष्ट केले. ट्विंकलसह फोटो घेण्यास नकार देत डिंपल म्हणाल्या कि,”मी माझ्या ज्युनिअरसोबत पोज देत नाही.” डिंपल म्हणतात कि,” ते फक्त सिनियर कलाकारांसोबतच पोज देतात.”
डिंपल कपाडियांच्या या कृत्याने नेटकऱ्यांचा फार मोठा प्रतिसाद आला आहे. या कृत्यावर एक नेटकरी लिहतो कि,”आजचे सिनिअर पण कधी काळी ज्युनिअर होते.” तर दुसरा प्रतिसाद देतो कि,” अभिनेत्री डिंपल कपाडिया फार कॉमेडी करत असतात.” तर एखाद्या नेटकऱ्याने डिंपल कपाडिया यांची तुलना चक्क जया बच्चन यांच्याशी केली आहे.
हे देखील वाचा : सोनम कपूर आणि आनंद आहुजाने खरेदी केले नीरव मोदीचे रिदम हाऊस, ठरली करोडोंची डील!
आईचा सिनेमा ‘गो नानी गो’ साठी लेक ट्विंकल खन्ना पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून आली होती. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ट्विंकल फार सुंदर दिसत होती. तसेच डिंपल कपाडिया यांचा जावई सिनेसृष्टीचा खिलाडी अक्षय कुमार या कार्यक्रमात राखाडी रंगाच्या सूटमध्ये दिसून आला होता. त्याने ब्लेजरच्या पांढराशुभ्र असा शर्ट परिधान केला होता. तसेच डिंपल कपाडिया याचा पेहरावदेखील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.