फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
‘बिग बॉस 18’ च्या शनिवारच्या भागामध्ये सलमान खानने घरातल्या सदस्यांची शाळा घेतली. यामध्ये त्यांनी विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दारंग, अविनाश मिश्रा आणि इशा सिंह यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी विवियन डिसेनाला स्पष्ट सांगितले की तू घरामध्ये काहीही करत नाहीस, तर घरातल्या दोन्ही जोडप्यानं सांगितलं आहे की, तुम्ही सगळे प्रेक्षकांना कन्फयुज करत आहेत. आता त्यानंतर सोशल मीडियावर नवा एक प्रोमो व्हायरल होत आहे यामध्ये विवियन डिसेनाची पत्नी आणि रजत दलालची आई घरामध्ये एंट्री करणार आहे.
‘बिग बॉस 18’ च्या आगामी एपिसोडमध्ये विवियन डिसेनाची पत्नी नूरन एली दिसणार आहे. प्रोमोनुसार, नूरन विवियनला फीडबॅक देताना दिसत आहे. नूरन म्हणते, ‘कसा आहेस?’ तुला तुझ्याबद्दल काय वाटतं?’ विवियन म्हणतो, ‘आज मला वाटले की मी अगदी काठावर उभा आहे.’ नूरन म्हणते, ‘फक्त आजच? तुमच्या चाहत्यांनी हे फार पूर्वीच लक्षात घेतले आहे. याची जाणीव संपूर्ण कुटुंबाला होत आहे. तू, तू नाही आहेस.’
Bigg Boss 18 : सलमान खान चुम आणि करणच्या नात्यावर करणार प्रश्न, तर अविनाश – ईशाला देणार रिॲलिटी चेक
नूरन पुढे म्हणते, ‘काय होत आहे? विवियन कुठे आहे? जाण्यापूर्वी तू मला वचन दिलेस की तू खेळशील आणि ट्रॉफी घेऊन येशील. तुम्ही ट्रॉफीसाठी खेळत आहात असे वाटते का तुला? विवियन म्हणतो, ‘नाही.’ तेव्हा नूरन म्हणते, ‘करणने अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की तो तुझा मित्र नाही. मग तुमच्या मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर का आहे? माझे रक्त उकळू लागते.
BIGG BOSS 18 PROMO : #VivianDsena Aur Nouran Huye Emotional, Nouran Ne Kiya Cheer up#WeekendKaVaar #BiggBoss18 pic.twitter.com/fgYh8sMCWq
— BiggBoss24x7 (@BB24x7_) December 14, 2024
विवियन डिसेनाच्या पत्नी नूरनने जेव्हा करणवीर मेहराबद्दल विवियन डीसेनाला सांगितले तेव्हा, एका प्रेक्षकाने लिहिले आहे की, प्रिय @NouranAly01 मला असे वाटते की तुला तुझ्या नवरा विवियन डिसेनाबद्दल चुकीची माहिती आहे की त्याला सॉफ्ट कॉर्नर आहे करणवीर मेहरा बद्दल. कारण जर त्याच्यात सॉफ्ट कॉर्नर असेल तर करणवीर मेहरा टाइम गॉड बनण्यात यशस्वी होत नव्हता तेव्हा तो सर्वात आनंदी का असता?
Dear @NouranAly01
I feel you are quite mistaken that your husband @VivianDsena01 has soft corner for @KaranVeerMehra
Because if he had a soft corner then why would he be d happiest when #KaranveerMehra doesn’t succeed in becoming TG?
NATION LOVES KARAN VEER SHOW#BiggBoss18 pic.twitter.com/EODqyV16Nr
— Mr.Hunt (@asliMrHunt) December 14, 2024
दुसऱ्या युझरने लिहिले आहे की, श्रीमती विवियन डिसेना कोणत्या सॉफ्ट कॉर्नरबद्दल बोलत आहेत? विवियन हा नेहमीच पहिला व्यक्ती आहे जो करणला स्वतःच्या विजयाचे नियोजन करण्याऐवजी हरवण्याचा कट रचतो. बखूप चांगला ‘सॉफ्ट कॉर्नर’ आहे. लाज वाटली @NouranAly01