फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 विकेंडचा वॉर : बिग बॉस 18 सध्या खूप चर्चेत आहे. सलमान खानच्या या शोमध्ये एकीकडे स्पर्धक एकमेकांचे शत्रू झाले आहेत, तर दुसरीकडे आता घराघरात प्रेमाचा अँगलही पाहायला मिळत आहे. यावेळी या शोमधील लव्ह अँगलबद्दल जर कोणाची सर्वाधिक चर्चा असेल तर ते अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग. दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे. तर दुसरी जोडी ती म्हणजेच करणवीर मेहरा आणि चुम दारंग यांच्या नात्यावर काल बिग बॉसने चर्चा केली तर आज आगामी भागामध्ये सलमान खान बोलताना दिसणार आहे. आता शोचा नवा प्रोमो समोर आला आहे यामध्ये सलमान खान दोन्ही जोड्याना प्रश्न करणार आहे.
Bigg Boss 18 : चार आठवड्यानंतर या सदस्याला दाखवला घराबाहेरचा रस्ता!
बिग बॉस 18 चा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच सलमान खान गाणं गातो आणि म्हणतो की, ” चुम है किसी के प्यारे में” यावर दोघेही हसायला लागतात. यावर पुढे सालांना खान करणवीरला म्हणतो की, करण तू अजुनपर्यत डायरेक्ट विचारलेले नाही आहेस, पण तू तुझ्या भावना नेहमीच तिच्यापर्यत (चुम) पोहोचवल्या आहेत. नातं असूनही तुम्ही दोघे त्या नात्याला नाकारत आहेत. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा तुमच्या या नात्यामुळे गोंधळले आहेत. यावर चुम सलमान खानला सांगते की असं काही नाही आहे मी त्याला खूप पसंत करते पण सध्या खूप गुंतागुंतीचं आहे. यावर आता त्यांचे नाते स्पष्ट होईल की ते दुरावा निर्माण होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
आता नवा प्रोमो बिग बॉसने प्रदर्शित केला आहे यामध्ये बिग बॉसने इशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या दोघांना प्रश्न करताना सलमान म्हणाला की, इशा आणि अविनाश टीव्हीवर जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला बऱ्याच काही गोष्टी दिसत असतात. तुमच्या नात्यामधील अट्रॅक्शन, फ्लर्टींग त्याचबरोबर समोरून सुद्धा प्रतिसाद दिला जातो मग तुम्ही का अडखळत आहेत. यावर इशा म्हणते की, मी त्याला खूप चांगला मित्र समजते. मग तु त्याला एवढा भाव का देत आहेस आणि मागत सुद्धा असतेस त्यावर तुझ्या प्रतिक्रिया सुद्धा का देत आहेस. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा तुमच्या नात्यावर गोंधळले आहेत.
Eisha aur Avinash ki platonic dosti aayi Salman Khan ke radar mein. ☢️
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #Harpic #GoCheese#BiggBoss18 #BiggBoss #BB18… pic.twitter.com/BfiNtj28ec
— ColorsTV (@ColorsTV) December 14, 2024
शोमध्ये करणवीर मेहरा आणि चुम यांच्यातील केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, घराबाहेरच्या नात्यांबद्दल बोलताना चुम एका एपिसोडमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलताना ऐकली होती. तर करणवीर मेहराने दोनदा लग्न केले आहे. तथापि, त्याचे दोन्ही विवाह चांगले चालले नाहीत आणि त्याने दोनदा घटस्फोट घेतला आहे.