
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस १९ हा हिंदी टेलिव्हिजनवर चर्चेत असलेला शो आहे. अनेक लोक या शोचे चाहते आहेत. टीव्हीपासून ओटीटी पर्यंत बिग बॉस प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. बिग बॉसचा १९ वा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस १९ चा विनर नक्की कोण असेल याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. फिनाले देखील काही दिवसांत मोठ्या उत्साहात होणार आहे. असं असताना फिनाले आधीच बिग बॉस १९ च्या विजेत्याचं नाव समोर आले आहे. इतकंच नाही तर टॉप 5 फायनलिस्टची कोण आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात बिग बॉस १९ च्या विनरची लिस्ट पाहायला मिळतेय आहे. या फोटोमध्ये सगळ्या स्पर्धकांची नावे त्याचबरोबर इविक्शन, फायनलिस्टची नावंही दिसत आहे. प्रणीत मोरे खेळातून आऊट झाला आहे हे देखील यात मेन्शन करण्यात आले आहे. तसेच आता ही व्हायरल होणारी पोस्ट खरी आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सोनाक्षीला लग्नानंतर सासू- सासऱ्यांसोबत राहण्याची नव्हती इच्छा? पती झहीरला आधीच केले स्पष्ट
व्हायरल होत असलेल्या लिस्टमध्ये अभिनेता गौरव खन्ना ‘बिग बॉस १९’ चा विनर असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर टॉप ५ फायनलिस्टमध्ये गौरव खन्ना ( विनर ), अभिषेक बजाज ( रनर अप ), फरहाना भट्ट ( सेकंड रनर अप ), अमाल मलिक ( थर्ड रनर अप ) आणि तान्या मित्तल ( फोर्थ रनर अप ) असल्याचे दिसत आहे. या यादीत लिहिल्यानुसार आतापर्यंत अचूक स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. आणि प्रणित मोरेचं देखील नाव आहे.
आता या लिस्टमध्ये किती खरं आणि किती खोटं आहे हे येणाऱ्या एपिसोडमध्ये आणि फिनालेमध्येच कळणार आहे. बिग बॉस १९ चा ग्रँड प्रीमियर २४ ऑगस्टला झाला होता. १०५ दिवसांनंतर या शोचा फिनाले होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ७ डिसेंबर २०२५ ला ‘बिग बॉस’ चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आणि याकडे चाहत्यांचा लक्ष वेधून राहिले आहे.
उद्योगपती वेदांत बिर्ला अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रीण तेजल कुलकर्णीशी केले लग्न
दरम्यान बिग बॉसच्या शेवटच्या काही आठवड्यात ड्रामा क्विन राखी सावंत घरात येणार असल्याच्या चर्चा आहेत. राखी सावंत नुकतीच दुबईहून भारतात आली आहे. ती बिग बॉस १९ मध्ये जाणार असल्याचं तिने स्वत: सांगितलं आहे. बिग बॉस १९ च्या घरात जाण्याआधीच राखी सावंतने तान्य मित्तला ट्रोल केले आहे. घरात गेल्यानंतर राखी सावंत आणि तान्या मित्तल आमने सामने येणार आहेत. हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. राखी सावंत बिग बॉस १९ मध्ये कधी एन्ट्री घेणार याकडेसगळ्यांचं लक्ष आहे.