(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
उद्योगपती यशोवर्धन बिर्ला आणि अवंती बिर्ला यांचा मुलगा वेदांत बिर्ला विवाहबंधनात अडकला आहे. त्यांनी तेजल कुलकर्णीशी लग्न केले. त्यांचा विवाह २ नोव्हेंबर रोजी झाला आणि त्यामुळे बातम्यांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ३ नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्नाचे रिसेप्शन झाले. रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. याचबरोबर अनेक मोठमोठ्या कलाकारांसह नेते, खासदार आणि आमदार देखील उपस्थित होते. तसेच या दोघांच्या लग्नाचेही फोटो सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये दोघेही आनंदी दिसत आहे.
उर्वशी रौतेची रिसेप्शन पार्टीला हजेरी 
रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उर्वशी रौतेला तिचा भाऊ यशराज रौतेला आणि आई मीरा रौतेलासोबत आली होती. उर्वशीने सोनेरी आणि सिल्वर रंगाची चमकदार साडी घातली होती, अभिनेत्रीने साडीला मॅचिंग ब्रेसलेट आणि कानातले देखील घातले होते. तिने कमीत कमी मेकअप आणि स्टायलिश वेणी देखील घातली होती. अतुल अग्निहोत्री आणि अलविरा खान यांनीही वेदांत बिर्ला आणि तेजल यांच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती.
नील नितीन मुकेशहे देखील त्यांच्या पत्नी रुक्मिणीसोबत दिसले. तसेच भूमी पेडणेकर, पूनम ढिल्लन, निया शर्मा, नीलम कोठारी, समीर सोनी, सीमा सजदेह आणि अभिनेत्री मधु यांसारखे अनेक स्टार या पार्टीमध्ये उपस्थित झाले होते. दरम्यान, निया शर्मा एका स्टायलिश लूकमध्ये दिसली. जिथे तिने फुलांचा ड्रेस, मोठा केसांचा अंबाडा आणि कानातले घातले होते. तिने सुंदर पोज देखील दिली. ती खूपच सुंदर दिसत होती. सगळ्या कलाकारांचे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
सोनाक्षीला लग्नानंतर सासू- सासऱ्यांसोबत राहण्याची नव्हती इच्छा? पती झहीरला आधीच केले स्पष्ट
वेदांत आणि तेजलबद्दल बोलायचे झाले तर, वेदांतने गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती आणि ती पांढऱ्या रंगाच्या पँटसोबत जोडली होती. तेजलने पूर्ण सिल्वर ड्रेस परिधान केला होता. ज्यावर तिने कमीत कमी दागिने, भांगेत टिक्का आणि तिचे केस मोकळे सोडले होते. ते एकत्र खूप आनंदी दिसत होते. तसेच या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती.
भूमी पेडणेकरनेही कानातले आणि केसांचा बन, चोकर नेकलेस आणि भरतकाम केलेल्या पोशाखाने तिचा लूक पूर्ण केला होता. अभिनेत्री मधूनेही तिच्या मुलींसह पार्टीला हजेरी लावली. मधूच्या मुलींचे आता व्हायरल होत आहेत. तसेच आता सोशल मीडियावर वेदांत आणि तेजलचे लग्नाचे फोटो पाहून चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.






