Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेक्षकांच्या नाराजीमुळे सिनेमात होणार बदल? Janhvi Kapoor चे ते Bold Seen चर्चेत; दिग्दर्शकाने मागितली माफी

राम चरण आणि जाह्नवी कपूर यांच्या पेद्दी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळत असतानाच काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेनंतर दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी माफी मागत आपली भूमिका स्पष्ट केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2026 | 02:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रेक्षकांशी संवाद साधणारा आणि त्यांना प्रेरणा देणारा प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
  • व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया गांभीर्याने घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
  • सन्मान, प्रतिष्ठा आणि आदराने पडद्यावर सादर केले जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर यांचा पेद्दी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. ४ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठल्याचे सांगितले जात आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असताना काही दृश्यांवरून सोशल मीडियावर वादही निर्माण झाला आहे. विशेषतः जाह्नवी कपूरच्या पात्राचे चित्रण आणि काही रोमँटिक दृश्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. या वादानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी खुलासा करत माफी मागितली आहे.

Subodh Bhave video: सुबोध भावेचा परदेशातील भन्नाट जुगाड चर्चेत; व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क

चित्रपटातील काही दृश्यांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याचे लक्षात आल्यानंतर बुची बाबू सना यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल खेद व्यक्त केला. सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो प्रेक्षकांशी संवाद साधणारा आणि त्यांना प्रेरणा देणारा प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.

बुची बाबू सना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, महिलांविषयी त्यांना नेहमीच आदराची भावना आहे. कोणत्याही महिला पात्राचे वस्तूकरण करणे किंवा त्यांचा अपमान करणे हा त्यांच्या चित्रपटाचा उद्देश नव्हता. मात्र, चित्रपटातील काही दृश्ये प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटली असतील, तर त्या भावना ते समजून घेत असून त्यांचा आदर करतात. तसेच या संदर्भात व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया गांभीर्याने घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर त्यांनी चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. प्रेक्षकांकडून आलेल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केल्यानंतर संबंधित दृश्यांमध्ये आवश्यक बदल केले जातील, असे त्यांनी सांगितले. बदलत्या सामाजिक जाणीवा, संवेदनशीलता आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन चित्रपट निर्मात्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक महिलेला सन्मान, प्रतिष्ठा आणि आदराने पडद्यावर सादर केले जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, पेद्दी चित्रपटातील राम चरण आणि जाह्नवी कपूर यांच्या काही रोमँटिक दृश्यांवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. विशेषतः एका दृश्यात नायिकेच्या संमतीशिवाय तिला चुंबन दिल्याचे दाखवण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नायिका रडताना दिसत असल्याने या दृश्यावर अधिक टीका झाली. तसेच आणखी एका प्रसंगात काही गुंड नायिकेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटात जाह्नवी कपूरला काही ठिकाणी अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोपही अनेक प्रेक्षकांनी केला आहे.

Peddi Movie Collection : ‘आया रे तुफान’! अवघ्या २४ तासांत ‘पेड्डी’ची १०० कोटींच्या क्लबमध्ये धडाकेबाज एन्ट्री

चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळत असले तरी या वादामुळे पेद्दी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता दिग्दर्शकांनी बदलांचे आश्वासन दिल्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Buchi babu sana stated that janhvi kapoors bold scene would be removed from the film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Bold Look
  • Janhvi Kapoor

संबंधित बातम्या

Peddi Movie Collection : ‘आया रे तुफान’! अवघ्या २४ तासांत ‘पेड्डी’ची १०० कोटींच्या क्लबमध्ये धडाकेबाज एन्ट्री
1

Peddi Movie Collection : ‘आया रे तुफान’! अवघ्या २४ तासांत ‘पेड्डी’ची १०० कोटींच्या क्लबमध्ये धडाकेबाज एन्ट्री

Janhvi Kapoor: राम चरणच्या ‘पेड्डी’मध्ये जान्हवी कपूरचा अपमान? एका ‘लाईक’मुळे सोशल मीडियावर खळबळ
2

Janhvi Kapoor: राम चरणच्या ‘पेड्डी’मध्ये जान्हवी कपूरचा अपमान? एका ‘लाईक’मुळे सोशल मीडियावर खळबळ

भक्तीत लीन झाली जान्हवी कपूर,अनवाणी पायांनी ३५५० पायऱ्या चढून घेतले तिरूपती बालाजीचे दर्शन
3

भक्तीत लीन झाली जान्हवी कपूर,अनवाणी पायांनी ३५५० पायऱ्या चढून घेतले तिरूपती बालाजीचे दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.