
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राम चरणचा पेड्डी हा चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पेड्डी या चित्रपटाची प्रेक्षकांना आताच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे पहिलं गाणं चिकिरी चिकिरी प्रदर्शित झालं आहे. या गाण्यासाठी चाहत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त उत्साह होता. राम चरणने आधीच या गाण्याचं पोस्टर आणि एक छोटं व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना झलक दाखवली होती. त्या झलकानंतर चाहत्यांची आतुरता आणखीनच वाढली होती, आणि आता अखेर चिकिरी चिकिरी रिलीज झालं आहे.
पेड्डीचं पहिलं गाणं चिकिरी चिकिरी खरंच लक्षवेधी आहे. विशेष म्हणजे त्यातील ‘चिकिरी’ हा अनोखा शब्द. संपूर्ण गाण्यातील दृश्यं इतकी सुंदर आहेत की हे वर्षातील सर्वात आकर्षक मेलोडी ट्रॅकपैकी एक ठरू शकतं. संगीताच्या जादूगार ए.आर. रहमानने पुन्हा एकदा आपला जादू दाखवला आहे आणि या गाण्याच्या संगीतामध्ये जादुई स्पर्श आणला आहे. जर हा फक्त पेड्डीचा एक छोटा भाग असेल, तर स्पष्ट आहे की हा चित्रपट गुणवत्ता आणि सर्जनशीलतेच्या बाबतीत उत्कृष्ट ठरणार आहे.
निर्मात्यांनी या गाण्याद्वारे खरंच एक अप्रतिम रत्न सादर केलं आहे मोहित चौहानच्या सुरेल आवाजामुळे हे गाणं अजूनच खास बनलं आहे आणि त्यामुळे ते एक उत्कृष्ट संगीत ट्रॅक ठरलं आहे.
या चित्रपटाचा टीझरमध्ये आपण राम चरणला त्यांचा सिग्नेचर बॅटिंग शॉट करताना पाहिलं होतं, आणि तोच क्षण या गाण्यातही दिसतो. त्या झलकनेच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचवला होता, आणि आता हे गाणं त्या सर्व अपेक्षांवर खऱ्या अर्थाने उतरलं आहे.
उप्पेना फेम दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांचा पेड्डी हा एक ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित भावनिक ड्रामा मानला जात आहे. हा चित्रपट राम चरणच्या करिअरमधील सर्वात तीव्र भूमिकांपैकी एक ठरणार आहे. या चित्रपटाच्या मोठ्या स्केलमुळे, दमदार कलाकारांमुळे आणि ए.आर. रहमानच्या संगीतामुळे या प्रकल्पाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
बुच्ची बाबू सना लिखित आणि दिग्दर्शित पेड्डीमध्ये राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत शिवा राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपति बाबूही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. वेंकटा सतीश किलारू निर्मित हा चित्रपट 27 मार्च 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.