
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्न यांचा नुकताच चर्चेत असलेला ‘टू मच’ हा चॅट शो सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. या कार्यक्रमात प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी सहभागी होताना दिसले होते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या कार्यक्रमात पाहुणे म्हणून येतात. या शोच्या सहाव्या भागात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा पाहुणे म्हणून दिसणार आहेत. सध्या या विशेष भागाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्वजण कंडोम खरेदी करण्याबाबतच्या भारतीय मानसिकतेवर चर्चा करताना दिसले आहेत.
‘ही मॅन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘जय- वीरू’ पुन्हा झळकणार पडद्यावर; ‘Sholay’ होणार री- रिलीज
‘टू मच’ या चॅट शोमध्ये एक सेगमेंट असा असतो की ज्यात पाहुण्यांना चर्चा करण्यासाठी एक विषय दिला जातो. जर ते त्या विषयाच्या बाजूने असतील. तर ते त्या अँगलने त्यांचे मत मांडतात आणि जर विरोधात असतील तर त्याबाजूने बोलतात. सोनाक्षी सिन्हा आणि मनीष मल्होत्रा असलेल्या या विशेष भागात,”भारतीय लोक फेअरनेस क्रीम खरेदी करण्यापेक्षा कंडोम खरेदी करताना अधिक लाजतात” या विषयावर चर्चा झाली. या विषयाला ट्विंकल खन्ना आणि मनीष मल्होत्रा समर्थन दिले नाही, तर सोनाक्षी सिन्हा आणि काजोल यांचा असा विश्वास होता की कंडोम खरेदी करताना भारतीय लोक लाजतात.
बे दुणे तीन या मराठी ओरिजिनल मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित,अभय-नेहाच्या आयुष्याचा गोड-तिखट प्रवास
काजोल या विषयावर बोलते,”लोकांना लाज वाटते. फेअरनेस क्रीम खरेदी करण्यासाठी गेलात, तर सहज सांगतात की ‘ती शाहरुख खान वाली क्रीम द्या”. पण कंडोम खरेदी करताना लाज वाटते. म्हणतात,”माझा मित्र आणून देईल”. यावर मनीष मल्होत्रा म्हणाला की असे काही नाही. भारत बदलला आहे. ट्विंकल खन्ना यांनीही मनीषला समर्थन दिले. तेव्हा काजोल म्हणाली,” तुम्ही किती वेळा मेडिकल स्टोअरमध्ये गेली आहेस?”. त्यावर अभिनेत्री म्हणते,”मी सॅनेटरी पॅड्ससाठी जाईल, पण कंडोमसाठी नाही. ते दुसरं कोणाचं तरी डिपार्टमेंट आहे”.
मनीष मल्होत्रा पुढे म्हणतो की भारत बदलला आहे आणि कंडोम खरेदी करताना कोणालाही कसली भीती वाटत नाही. त्यावर सोनाक्षी सिन्हा विचारते, “असं असेल तर मग आपली लोकसंख्या इतकी का आहे?”. हे ऐकून काजोल हसते. सोनाक्षी पुढे म्हणते की,” यावरून स्पष्ट होते की बहुतेक लोक कंडोम खरेदी करत नाहीत. त्यावर मनीष मल्होत्रा म्हणतो की, “माझ्या मते असे काही नाही”.