Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तिघी’ चित्रपटात उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची अनोखी गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित होताच वाढली उत्सुकता

‘तिघी’ हा मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अशातच आता चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या चित्रपटामध्ये तीन दिग्गज अभिनेत्री झळकणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 24, 2026 | 02:24 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘तिघी’ मध्ये उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची गोष्ट
  • ‘तिघी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
  • ‘तिघी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

आई–मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं असतं. तरीही मनाच्या अदृश्य धाग्यांनी कायम जोडलेलं असल्याचं दिसून आले आहे. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणारा ‘तिघी’ हा आगामी मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली असून, भावनांचा आविष्कार अधिक ठळकपणे आणि प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न यात दिसून आला आहे.

ट्रेलर लाँच सोहळाही तितकाच भावनिक आणि संस्मरणीय ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासाठी खास सरप्राईज आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी चित्रफितीद्वारे शुभेच्छा देत वातावरण अधिक भारावून टाकले. कार्यक्रमात गायिका प्रियंका बर्वे आणि शरयू दाते यांनी चित्रपटातील गाणी सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. या वेळी नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, जिजीविषा काळे, जितेंद्र जोशी, निलेश मोहरीर, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे तसेच अभिनेत्री गिरिजा ओक यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित राहिली होती.

Alpha : YRF ने Netflix ची 215 कोटींची ऑफर नाकारली; आलिया-शर्वरीचा चित्रपट थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

अवघ्या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एका घरातल्या तीन स्त्रियांचं आयुष्य अत्यंत प्रभावीपणे उलगडताना दिसतं आहे. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील नात्याचे अनेक पैलू यातून समोर येतात. छोट्या-छोट्या भांडणांतून व्यक्त होणारा राग, न बोललेल्या अपेक्षा, अपूर्ण संवाद, आणि तरीही मनाच्या तळाशी असलेला न संपणारा जिव्हाळा या सगळ्याचं वास्तववादी चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं आहे. तिघींच्या आयुष्यात वेगवेगळे संघर्ष पाहायला मिळणार आहे. प्रत्येक जण स्वतःच्या प्रश्नांशी झुंज देताना दिसते. मात्र आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर त्या तिघी एकमेकींसाठी कशा उभ्या राहतात, याची उत्कंठा ट्रेलर शेवटपर्यंत टिकवून ठेवतो.

 

‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही चित्रपटाची टॅगलाईन केवळ संवाद नाही, तर संपूर्ण कथानकाचा आत्माच आहे. घर हे केवळ चार भिंतींचं नसून, तिथे साठलेल्या आठवणी, न बोललेले शब्द, तुटलेले आणि पुन्हा जुळणारे नात्यांचे धागे यांचं प्रतीक ठरतं. आई–मुलींच्या नात्यातील ताणतणाव आणि त्यामागील माया यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करणार आहे. दिग्दर्शिका जीजिविषा काळे याबद्दल म्हणाऱ्या, “आई आणि मुलींचं नातं अनेक थरांनी बनलेलं असतं. कधी ते वादातून व्यक्त होतं, कधी शांततेतून. ‘तिघी’मधून आम्ही या नात्याची खरी आणि प्रामाणिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला यात स्वतःचं घर आणि स्वतःचं नातं दिसेल.”

Subedaar Trailer: ‘सूबेदार’चा दमदार ट्रेलर रिलीज; ६९ व्या वर्षी ॲक्शन अंदाजात दिसले अनिल कपूर

चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस या तीन पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ची कथा आणि दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे. संवेदनशील आणि प्रगल्भ दृष्टीकोनातून आई–मुलींच्या नात्याचा वेध घेणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. आयुष्याच्या वळणावर तुटलेले धागे पुन्हा कसे जुळतात आणि नात्यांचा अर्थ नव्याने कसा सापडतो, याचं उत्तर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

Web Title: Tighi marathi movie trailer release sonalee kulkarni neha pendse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Emraan Hashmi Accident: शूटिंगदरम्यान क्रेनमधून कार निसटली; इम्रान हाश्मी आत होता? अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
1

Emraan Hashmi Accident: शूटिंगदरम्यान क्रेनमधून कार निसटली; इम्रान हाश्मी आत होता? अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Marathi Actress: ‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ वेगळ्या पद्धतीने साडी नेसल्याने अभिनेत्री झाली ट्रोल; सांगितला धक्कादायक अनुभव
2

Marathi Actress: ‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ वेगळ्या पद्धतीने साडी नेसल्याने अभिनेत्री झाली ट्रोल; सांगितला धक्कादायक अनुभव

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत
3

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
4

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.