(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी ZEE5 वर ५ डिसेंबर २०२५ रोजी येणाऱ्या नवीन ओरिजिनल मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘बे दुणे तीन’ ही मालिका आधुनिक नातेसंबंधांतील आनंद, गोंधळ आणि जीवनातील छोटे-छोटे अनुभव दाखवणारे विनोदी नाटक आहे. मालिकेत दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी, शुभांकर एकबोटे, क्षितिश दाते, पुष्करराज चिरपुटकर आणि शिवाणी रांगोळे प्रमुख भूमिका साकारत आहेत. ही कथा अभय आणि नेहा या तरुण जोडप्याभोवती फिरते, ज्यांना अचानक तीन बाळ होणार असल्याचे समजल्यावर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
या मालिकेचे दिग्दर्शन अथर्व सौंदणकर आणि हिमांशू पिले यांनी केले असून वृषांक प्रॉडक्शन्स यांनी निर्मिती केली आहे. जिव्हाळा, विनोद आणि वास्तववाद एकत्र करणारी एक ताजी, संबंधित कथा या मालिकेतून दिसून येते. बे दुणे तीन मध्ये प्रभावशाली अभिनय आणि मनाला भिडणारी कथा आहे आणि जोडप्यांशी व कुटुंबांशी खोलवर जुळण्याची खात्री देते.
सुरुवातीला आश्चर्य आणि अविश्वास दिसतो, पण लगेचच गोंधळ, गैरसमज, आणि नव्याने प्रेम अशा भावनांचा सलग प्रवाह प्रारंभ होतो. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अशा तीन एकमेकांत गुंफलेल्या काळांमध्ये या मालिकेचे कथन केले जात आहे आणि वैवाहिक आयुष्यातील बदलत्या परिस्थिती आणि यात जवळ येऊन ठेपलेल्या पालकत्वाचे चित्रण करण्यासाठी फारच कलात्मकरीत्या विनोद, भावना आणि सत्यता एकत्र गुंफल्या गेल्या आहेत. बे दुणे तीन संघर्ष, संबंध आणि स्वतःबाबतच्या जाणीवेतील क्षणांद्वारे आयुष्याचे जोडीदार आणि पालक म्हणून एकत्र पुढे जाण्याच्या गोड-तिखट प्रवासावर सुंदरपणे प्रकाश टाकते.
महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी? ‘आई तुळजाभवानी’चा पहा महा एपिसोड
हेमा व्ही.आर., बिझनेस हेड, मराठी ZEE5, म्हणाल्या, “मराठी ZEE5 येथे आम्हाला अशा कथा तयार करण्यात गर्व आहे ज्या महाराष्ट्रीयन घरांतील मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी दर्शवतात आणि लोकांना हसायला लावतात, विचार करायला लावतात आणि त्यांच्या मनाला खोलवर स्पर्श करून जातात.”
वृषांक प्रॉडक्शन्सच्या प्रतिनिधींनी सांगितले, “बे दुणे तीन ची संकल्पना तयार केली आम्ही प्रथम तयार केली तेव्हा आम्हाला प्रेम आणि जबाबदारी यांच्यातील नाजूक अंतर टिपायचे होते, तसेच तो काळ टिपायचा होता जिथे आयुष्यात नात्यातील ताकद पणाला लागली आहे, तरीसुद्धा त्याचा अर्थ अधिक खोलवर रुजलेला आहे. तीन बाळं होणार असे एका जोडप्याला समजल्याची कल्पना आयुष्याच्या अनिश्चिततेला आणि विनोदाला अगदी रूपक बनली. शो चालू असताना आपण पहाल की अगदी खऱ्या नात्यांप्रमाणेच एकाच वेळेस हसणे, निराशा आणि प्रेम एकत्र अनुभवायला मिळू शकतात. हे समप्रमाणात भावनिक, गंमतीशीर आणि प्रामाणिक आहे.”
अथर्व सौंदणकर आणि हिमांशू पिले या दिग्दर्शक जोडीने सांगितले की, “बे दुणे तीन च्या माध्यमातून जवळची असूनही चित्रपटासारखी वाटणारी कथा, जोडपे स्वतःमध्ये बघू शकतील असे काहीसे असणारी कथा सांगण्याचे आमचे ध्येय होते. अभय आणि नेहाचे नात्यात सुंदर पद्धतीने दोष भरले गेले आहेत; त्यात ते भांडतात, ते चुका करतात, पण खरे पाहता त्यांचे एकमेकांवर मनापासून प्रेम असते आणि आपोआप एकत्र जगायला शिकतात.”
क्षितीश दाते, जो अभयची भूमिका साकारत आहे, म्हणाला,”बे दुणे तीन ही खरोखरच वास्तवाच्या खूप जवळ वाटणाऱ्या कथांपैकी एक आहे. एका क्षणातच एक नव्हे तर तीन बाळांचा वडील बनण्याची कल्पना नैसर्गिक अनागोंदी माजवते आणि त्याचवेळी त्यामध्ये एक सुंदर हळवेपणा सुद्धा उघड करते. या मालिकेत काम करणे मनाला भिडणारी अनुभूती राहिली आहे, आणि प्रत्येक जोडपे आणि प्रत्येक कुटुंब अभय आणि नेहाच्या प्रवासात स्वतःचे थोडेसे तरी रूप पाहतील, असे मी खरोखर मानतो. मी खूप उत्साहित आहे कारण प्रेक्षकांना अखेर हा शो पाहायला मिळणार आहे आणि आमच्या जगाशी जोडता येणार आहे.”






