(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा अंडरवर्ल्डचा जोरदार प्रभाव होता. त्या काळात दाऊद इब्राहिमचं नाव खूप गाजत होतं आणि अनेक फिल्मी कलाकार त्याच्या प्रभावाखाली होते. काही अभिनेत्रींवर दाऊदचं मन आलं, काही त्याच्यावर भाळल्या आणि काही त्याच्यापासून लांब राहिल्या.
त्या काळात एक रहस्यमयी अभिनेत्री खूप चर्चेत आली जॅस्मीन धुन्ना. १९८८ मध्ये आलेल्या वीराना या हॉरर चित्रपटामुळे ती एकदम प्रसिद्ध झाली. या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेमुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. पण जशी तिची लोकप्रियता वाढली, तशी ती अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाली.
तिच्या गायब होण्यामागे अनेक गोष्टी सांगितल्या जातात. काही लोक म्हणतात की तिला अंडरवर्ल्डकडून त्रास दिला गेला, तर काहींचं म्हणणं आहे की तिने स्वतःहून बॉलिवूडला रामराम केला. काही अफवा अशाही आहेत की ती परदेशात जाऊन स्थायिक झाली.
‘वीराना’ हा चित्रपट रामसे ब्रदर्स श्याम आणि तुलसी रामसे यांनी दिग्दर्शित केला होता. हा एक लो-बजेट हॉरर चित्रपट होता, ज्याचा खर्च फक्त सुमारे ६० लाख रुपये होता. पण या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि त्या काळात तब्बल १.५ कोटी रुपयांची कमाई केली. तो काळातल्या सर्वात चर्चित भयपटांपैकी हा एक ठरला.या चित्रपटात जॅस्मीन धुन्नाने एक गूढ, मोहक आणि भीतीदायक स्त्रीची भूमिका साकारली होती.
‘असुरवन’च्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर केली धुमाकूळ! सचिन आंबात दिग्दर्शित चित्रपट
जॅस्मीन धुन्नाच्या अचानक झालेल्या गायब होण्यामागे सर्वात जास्त चर्चेत आलेली कथा म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी जोडलेली आहे.अनेक जुन्या रिपोर्ट्सनुसार, दाऊद जॅस्मीनवर फिदा झाला होता. ती कुठेही गेली तरी त्याची माणसं किंवा तो स्वतः तिच्या आसपास पोहोचत असे. तिला महागडी भेटवस्तू पाठवल्या जात होत्या आणि तिच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
जॅस्मीनसाठी हे सगळं खूप अस्वस्थ करणारं होतं. काही बातम्यांमध्ये तर असंही म्हटलं जातं की तिला धमक्याही दिल्या गेल्या. या सगळ्या दडपणामुळे आणि भीतीच्या वातावरणात तिने हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.