
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिचा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला. या भव्य सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. दीपिकाने मुंबईत चाहत्यांसह प्री-बर्थडे सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच चाहते या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
दीपिकाचा वाढदिवस थाटात साजरा
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दीपिका तिच्या काही चाहत्यांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी सुट्टीवरून घरी परतली. तिने त्यांच्यासोबत केक कापला. या कार्यक्रमादरम्यान ती खूप उत्साहित आणि आनंदी दिसत होती. दीपिकाच्या चाहत्यांनी तिच्यासाठी ओम शांती ओम चित्रपटातील एक गाणे देखील गायले. या कार्यक्रमादरम्यान, दीपिका तपकिरी रंगाचा स्वेटर परिधान केलेली दिसली.
Wishing you a very happy birthday @deepikapadukone 🎂🎉💝 thank you for everything 🎉 #HappyBirthdayDeepikaPadukone pic.twitter.com/hsn0Kpwvxq — Deepika Files (@FilesDeepika) January 4, 2026
अलीकडेच, दीपिका नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी न्यू यॉर्कला गेली होती. तिच्यासोबत तिचा पती रणवीर सिंग देखील दिसला होता. तिने त्याच्या धुरंधर चित्रपटाच्या यशाचा आनंदही साजरा केला. न्यू यॉर्क सुट्टीतील तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. तसेच दीपिकाने २००७ मध्ये शाहरुख खान अभिनीत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. आणि अभिनय कारकिर्दीत अभिनेत्रीची सुरुवात झाली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता, ज्यामुळे दीपिकाला प्रसिद्धी मिळाली. तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. तसेच आज अभिनेत्री तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.
Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू
दीपिका पदुकोणचे चित्रपट
दीपिका पठाण, गेहरियां, झिरो, पद्मावत, पिकू, हॅपी न्यू इयर, चेन्नई एक्सप्रेस, ये जवानी है दिवानी, रेस २, फायटर, कॉकटेल, रिझर्व्हेशन, लव्ह आज कल, चांदनी चौक टू चायना आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती शेवटची ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसली होती. त्याआधी ती ‘कल्की २८९८ एडी’ मध्ये दिसली. आता तिच्याकडे दोन चित्रपट आहेत. ती ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये शाहरुख खान, सुहाना खान आणि अभिषेक बच्चन आहेत. ती ‘एए२२एक्सए६’ या तेलुगू चित्रपटात देखील दिसणार आहे. दोन्ही चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे. तसेच दीपिका सध्या तिच्या गोड मुलीचे संगोपन करण्यात व्यस्त आहे.