(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई झाल्यापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.दीपिका अजूनही तिच्या कामासाठी तितकीच गंभीर आहे, पण मुलीमुळे तिने कामात काही अटी लागू केल्या आहेत.दीपिकाने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली आहे, ज्यावर बॉलीवूडमध्ये मोठी चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर, दीपिकाने मुलीसाठी आणखी एक खास बदल केला आहे, ज्यामुळे तिला काम आणि कौटुंबिक आयुष्य अधिक सुसंगत करता येईल.
दीपिका सध्या तिच्या मुलीच्या काळजीत व्यस्त आहे आणि आता सोशल मीडियावर याचा पुरावाही दिसू लागला आहे.अभिनेत्रीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मोठा बदल केला आहे, ज्यामुळे चाहत्यांकडून तिला भरभरून प्रेम मिळत आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटची प्रोफाईल फोटो बदलली आहे, ज्याने चाहत्यांच्या मनात तिच्या आईपणाचा आनंद अधिक वाढविला आहे.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
दीपिका पादुकोणने तिच्या नवीन इंस्टाग्राम डीपीमध्ये यावेळी स्वतःचा फोटो न लावता एक खास टी-शर्टचा फोटो लावला आहे. या टी-शर्टवर लिहिलं आहे – ‘In My Mom Era’ म्हणजेच “मी आता आईच्या भूमिकेत आहे”.
”खांद्यावरचा हात…”,अक्षय कुमार चाहत्यावर भडकला, एअरपोर्टवरचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल
दीपिकाने ८ सप्टेंबर २०२४ रोजी तिची मुलगी दुआला जन्म दिला होता. आता रणवीर सिंह आणि दीपिकाची मुलगी १ वर्षांची झाली आहे. तरीही, दीपिका आणि रणवीर यांनी अद्याप आपल्या मुलीचे चेहरा जगासमोर दाखवला नाही.
Good News: मुलगा झाला हो! परिणीती चोप्रा झाली आई, राघव चढ्ढाने शेअर केली आनंदाची बातमी
अलीकडे दीपिका पादुकोण पुन्हा एक कारणासाठी चर्चेत आहेत. तिने रणवीर सिंहसोबत अबू धाबी टूरिझमच्या ब्रांड अँबेसडरची भूमिका स्वीकारली आहे. सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीर यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला, ज्यात दीपिका हिजाब परिधान करताना दिसत आहे.हा व्हिडिओ पाहून काही लोकांनी त्यांना ट्रोल केलं खास करून त्यांच्या कपड्यांबाबत आणि दुसऱ्या देशाच्या टूरिझमचा प्रचार करत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना ते फारसे काही आवडले नाही.