Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणवीर सिंह बनला नॉर्थ अमेरिकेचा नवा सम्राट, अभिनेत्याने मोडला प्रभासच 9 वर्षांचा मोठा रेकॉर्ड

आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून थिएटरमध्ये प्रचंड यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात १२ अब्ज रुपयांचा टप्पा ओलांडला असून, आता 'बाहुबली २' च्या निर्मात्यांनी देखील कौतुक केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 29, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘धुरंधर 2’ लवकरच मोडणार ‘बाहुबली 2’ रेकॉर्ड
  • 9 वर्षांचा मोठा रेकॉर्ड ‘धुरंधर 2’ सज्ज
  • चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्या शुभेच्छा
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिवेंज’ हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून त्याच्या कमाईत कोणतीही घट होताना दिसत नाही. रणवीर सिंग अभिनीत हा चित्रपट नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि एस. एस. राजामौली यांच्या Baahubali 2: The Conclusion या चित्रपटाच्या नॉर्थ अमेरिकेतील ९ वर्ष जुन्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डच्या जवळ पोहोचला आहे.

‘वेंकी बॉक्स ऑफिस’च्या माहितीनुसार, ‘धुरंधर 2’ने नॉर्थ अमेरिकेत सर्वाधिक कमाईचा विक्रम प्रस्थापित केला असून ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड आधीच मोडल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘बाहुबली’चे निर्माता शोबू यारलागड्डा यांनी X वर लिहिले, “काल मी धुरंधर 2 द रिवेंज पाहिला आणि हे सांगण्याची गरज नाही की मला हा चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट सर्व विक्रम मोडत आहे आणि भारत तसेच जगभरात बॉक्स ऑफिसवर नवे मापदंड निर्माण करत आहे, हे पाहून आनंद झाला. संपूर्ण टीमचे अभिनंदन!” असे म्हणून त्याने या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

‘सनई चौघडे’ मालिकेतील कलाकारांचा अनोखा, प्रेरणादायी श्री तारक मंत्र उपक्रम! ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’त नोंदवला विश्वविक्रम!

‘धुरंधर: द रिवेंज’ आणि Baahubali 2: The Conclusion यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली 2’ने नॉर्थ अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटाचा विक्रम प्रस्थापित केला असून, या चित्रपटाने 20 मिलियन डॉलर्स (सुमारे 190 कोटी रुपये) पेक्षा अधिक कमाई केली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत ‘धुरंधर 2’ला हा विक्रम मोडता आलेला नसला, तरी तो त्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

 

Yesterday I watched #Dhurandhar2‌TheRevenge and needless to say I loved it and thoroughly enjoyed the film! Happy to see it breaking all the records and setting new box office benchmarks in India and worldwide! Congratulations to the entire team! 👏🏼👏🏼 https://t.co/ATl3o3bNTu — Shobu Yarlagadda (@Shobu_) March 28, 2026

बॉक्स ऑफिस मोजोच्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर 2’ने नॉर्थ अमेरिकेत आतापर्यंत 19.33 मिलियन डॉलर्स (सुमारे 183 कोटी रुपये) कमावले आहेत, तर पहिल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने या भागात 19.7 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. मात्र, सध्या थिएटर्समध्ये मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, हा सिक्वेल लवकरच नवा विक्रम प्रस्थापित करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लक्झरी गाड्या, आलिशान बंगला; अक्षय खन्नाची नेटवर्थ किती? ‘Dhurandhar’नंतर आता ‘रहमान डकैत’चं वाढलं मानधन!

‘धुरंधर 2’चे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आदित्य धर याने केली आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल असून, त्या चित्रपटाने जगभरात 1300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. ‘धुरंधर’ फ्रँचायझीचे एकूण कलेक्शन आता 2000 कोटींच्या जवळ पोहोचले असून, ते लवकरच Pushpa 2: The Rule या चित्रपटाचा विक्रम मागे टाकेल, असे म्हटले जात आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पंडोर आणि मानव गोहिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

 

Web Title: Dhurandhar 2 set to break 9 year old box office record in north america baahubali 2 producer react

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
2

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
3

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
4

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.