(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अलिकडेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या काही भागांमधून गायब असलेल्या अंबिका रंजनकर यांनी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले. ज्यामुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्री शो सोडण्याची चर्चा सुरू केली. तसेच, आता अभिनेत्रीने स्वतः शो सोडण्याच्या अफवांना निराधार ठरवत प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच काही नवीन पाहुण्यांनीही शोमध्ये प्रवेश करताना दिसले आहेत. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
अंबिका रंजनकर नाही सोडणार शो?
सर्व अफवांना पूर्णविराम देत, अंबिका रंजनकर यांनी टेलीचक्करशी बोलताना सांगितले की, ‘नाही, मी शो सोडलेला नाही. मी तारक मेहता का उल्टा चष्माचा भाग आहे.’ तसेच, शोपासून दूर राहण्याचे कारण सांगताना अभिनेत्री म्हणाली की, ‘मी काही वैयक्तिक कारणांमुळे दूर होते. मला स्वतःसाठी थोडा वेळ हवा होता.’ याशिवाय, १७ वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागापासून अभिनेत्री या शोचा भाग आहे. तसेच आता अभिनेत्री हा शो सोडत असल्याचे समोर आले आहे.
मालिकेत होणार नवीन पाहुण्यांची एन्ट्री
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी नुकतेच गोकुळधाम सोसायटीमध्ये एका नवीन राजस्थानी कुटुंबाचे स्वागत केले आहे. ही माहिती इन्स्टाग्रामवर एका प्रोमोद्वारे शेअर करण्यात आली आहे. या शोमध्ये रतन-रूपाचे कुटुंब आता गोकुळधामचे नवीन रहिवासी बनले आहे. तसेच हे कुटुंब आता प्रेक्षकांचं किती मनोरंजन करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नवीन पात्र कोण आहेत?
नवीन पात्रांबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता कुलदीप गौर रतन बिंजोलाची भूमिका साकारत आहे, जो एका साडीच्या दुकानाचा मालक आहे. दुसरीकडे, धरती भट्ट बिंजोलाची पत्नी रूपा बदितोपची भूमिका साकारत आहे, जी गृहिणी तसेच सोशल मीडिया इनफ्लुएन्सर आहे. याशिवाय, त्यांची मुले, वीर आणि बंसारी, म्हणजेच अक्षन सेहरावत आणि माही भद्रा यांनी त्यांच्या मुलांची भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधले आहे. तसेच आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेला १७ वर्ष पूर्ण होणार असून, याचे मोठे सेलेब्रेशन गोकुळधाम सोसायटीमध्ये होणार आहे.