(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोशल मीडिया इनफ्लुएन्सर आणि ‘द ट्रेटर्स’ फेम स्पर्धक अपूर्वा मुखिजा पुन्हा एकदा चर्चेत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादामुळे चर्चेत आलेली अपूर्वा पुन्हा एकदा वादात सापडली आहे. मात्र, यावेळी हा वाद अपूर्वाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. अपूर्वाचा एक्स-बॉयफ्रेंड उत्सव दहियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गाणे गाताना दिसत आहे आणि अपूर्व मुखिजावर फसवणूकीचा आरोप करत आहे. आता सोशल मीडिया वापरकर्ते उत्सवच्या दाव्यांवरून अपूर्वाला खूप ट्रोल करत आहेत. चला जाणून घेऊयात उत्सव दहिया काय म्हणाला आहे?
कोण आहे उत्सव दहिया?
अपूर्वा मुखिजाने तिच्या जुन्या व्लॉगमध्ये उत्सवसोबत अनेक व्हिडिओ बनवले आहेत. तिने उत्सवला डेट करत असल्याचेही कबूल केले होते. अपूर्वाचा एक्स प्रियकर उत्सव हा एक कंटेंट क्रिएटर आहे. त्याचे इन्स्टाग्राम ८८.३ हजार फॉलोअर्स आहेत. यासोबतच तो इन्स्टाग्रामवर ट्रॅव्हल व्लॉग आणि त्याचे गाण्याचे व्हिडिओ शेअर करताना दिसत असतो. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो एक इन्व्हेस्टमेंट बँकर देखील आहे. तो २०१९ पासून मॉर्गन स्टॅनली कंपनीमध्ये काम करत आहे. मुंबईत वाढलेल्या उत्सवने चंदीगडमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने पीईसी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण देखील घेतले आहे.
व्हिडिओमध्ये अपूर्वाचे गुपित उघड झाले
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या उत्सवाच्या व्हिडिओमध्ये, त्याने अपूर्वाच्या प्रसिद्ध डायलॉग ‘हॅलो क्यूट लिटिल रेड फ्लॅग’ ने त्याच्या गाण्याची सुरुवात केली. व्हिडिओमध्ये त्याने ‘द ट्रेटर्स’ फेम अपूर्वाचे नाव घेतले नसले तरी, अपूर्वाच्या सिग्नेचर डायलॉगवरून हे स्पष्ट झाले की हा व्हिडिओ उत्सवने अपूर्वावर टीका करण्यासाठी बनवला आहे. त्याने गाण्यात म्हटले आहे की रिलेशनशिपमध्ये अपूर्वाने त्याला फसवले आणि सॉरीही म्हटले नाही. यासोबतच उत्सवने सांगितले की अपूर्वाने लोकांसमोर माझी प्रतिमा खराब केली आणि मला रेड फ्लॅग म्हटले, जे ती स्वतः होती.’
सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ
‘रेबेल किड’वरील उत्सवचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. उत्सवने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आता जर कोणी इतर काही बकवास केली तर मी थेट स्क्रिप्ट काढेन.’ या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्ते उत्सवाचे समर्थन करत आहेत आणि अपूर्वाला चुकीचे म्हणत आहेत. तसेच, या व्हिडिओवर ‘रिबेल किड’ अपूर्वा मुखिजा कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.