(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दिव्या खोसला आणि नील नितीन मुकेश यांच्या आगामी ‘एक चतुर नार’ या चित्रपटाचे शीर्षक आणि पहिला लूक आज प्रदर्शित झाला आहे. शीर्षक आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट एक विनोदी-नाटक असल्याचे दिसते आहे. चित्रपटाचा पहिला लूक समोर आल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करणार आहे.
दिव्या भाज्या कापताना दिसली
निर्मात्यांनी चित्रपटाचे दोन मोशन पोस्टर रिलीज केले आहेत. एका पोस्टरमध्ये दिव्या खोसला आणि नील नितीन मुकेश एका टेबलाजवळ उभे आहेत. टेबलावर टोमॅटो आणि सिमला मिरचीसह काही भाज्या ठेवल्या आहेत. दिव्या चाकूने गाजर कापताना कॅमेऱ्याकडे धूर्त नजरेने पाहत आहे. तिच्या शेजारी नील नितीन मुकेश थ्री-पीस घालून आणि हातात बंदूक घेऊन उभा आहे. या मोशन पोस्टरमध्ये, बॅकग्राउंडमध्ये कैलाश खेरच्या आवाजात चित्रपटाच्या शीर्षकाशी संबंधित काही ओळी देखील ऐकू येत आहेत.
नील घाबरलेला दिसत होता
तसेच या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज झाले आहे. यामध्ये दिव्या खोसला काळ्या चष्म्यात दिसत आहे. तिची वेणी सापाच्या आकारात तोंड उघडे ठेवून आहे आणि नील नितीन मुकेश फ्लिप फोनच्या आतमध्ये घाबरलेला दिसत आहे. या मोशन पोस्टरमध्येही गाण्याच्या काही ओळी बॅकग्राउंडमध्ये ऐकू येत आहेत. तसेच चित्रपटाचे दोन्ही पोस्टर आकर्षित आहेत. दोन्ही पोस्टरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
गायक आतिफ अस्लमच्या वडिलांचे निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट
चित्रपट कधी होणार प्रदर्शित
या कॉमेडी ड्रामा चित्रपटात नील आणि दिव्या पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहेत. टी-सीरीज निर्मित, हा चित्रपट उमेश शुक्ला दिग्दर्शित करत आहेत. ‘एक चतुर नार’ १२ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांचं भरभरून १२ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात मनोरंजन होणार आहे. तसेच या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.