(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी आणि अभिनेत्री यामी गौतम पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत, आणि त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची झलक आधीच समोर आली आहे. आता त्यांच्या चित्रपट ‘हक’च्या नवीन गाण्यात ‘कुबूल’मध्ये त्यांची अतिशय सुंदर आणि मनाला भिडणारी केमिस्ट्री पाहायला मिळते.
हे गाणं ‘जंगली म्युझिक’ने शेअर केलं आहे. प्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांनी या गीताची रचना केली आहे, जे त्यांच्या सर्वात भावनिक आणि रोमँटिक गाण्यांपैकी एक मानलं जातं. हे गाण किशोर यांनी लिहिले आहे आणि ते अरमान खान यांनी त्यांच्या मनाला भिडणाऱ्या आवाजात गायले आहेत. ‘कुबूल’ हे एक अशा प्रकारचे गाणं आहे जे प्रेम, अपूर्ण शब्दांतून भावना व्यक्त करतं.चित्रपटाच्या म्युझिक अल्बममध्ये आणखीही अनेक मनाला भिडणारे गाणी आहेत, जसे की ‘दिल तोड़ गया तू’ आणि काही अन्य गाणी जी लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
इमरान हाशमी म्हणाला, “जेव्हा एखाद्या चित्रपटाचं संगीत त्याची आत्मा बनतं, तेव्हा त्याचा परिणाम आणखी खोलवर होतो. ‘कुबूल’ असंच एक गाणं आहे. विशालने ते अत्यंत खास प्रकारे तयार केलं आहे.”
अभिनेत्री यामी गौतम या गाण्याबद्दल बोलताना म्हणाली, हे गाणं सादर करणं म्हणजे एक भावनिक प्रवास होता.”
विशाल मिश्रा म्हणाले, ‘‘हक’चं संगीत भावना आणि भारतीय सुरांच्या ताकदीवर आधारित आहे. ‘कुबूल’ ही प्रेमाची अशी भावना आहे जिथे भारतीयतेचा आणि आधुनिकतेचा संगम आहे. मी या गाण्याला खरं, साधं आणि तरी ते चित्रपटासारखं भासावं, असं बनवण्याचा प्रयत्न केला आहे.”
‘कुबूल’ गाणं रिलीज
‘कुबूल’ आता जंगली म्युझिकवर आणि सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्स तसेच यूट्यूबवर उपलब्ध आहे. ‘हक’ हा चित्रपट जंगली पिक्चर्स, इन्सोमनिया फिल्म्स आणि बावेजा स्टुडिओज यांच्या संयुक्त निर्मितीने तयार झाला आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘हक’मध्ये यामी गौतम आणि इमरान हाशमीची सुंदर रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.