Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या आठवणींना उजाळा, ‘वध २’च्या प्रमोशनदरम्यान NSDमध्ये खास संवाद; इरफान खानबद्दल संजय मिश्रा काय म्हणाले?

“ *त्यांना पाहत राहणं एक शिकवण होती”: NSDचे दिवस आणि इरफान खानबद्दल संजय मिश्रा काय म्हणाले जाणून घेऊया

  • By अमृता यादव
Updated On: Feb 02, 2026 | 01:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

२०२६ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘वध २’ आता लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. या चित्रपटात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा हे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. कलाकारांच्या दमदार अभिनयावर आधारित ही फ्रँचायझी असल्याने सुरुवातीपासूनच चित्रपटाची चर्चा सुरू आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. संजय मिश्रा, नीना गुप्ता आणि कुमुद मिश्रा हे तिघे नुकतेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), नवी दिल्ली येथे गेले. ते सर्व NSDचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे तेथे त्यांना विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि रंगभूमीप्रेमींनी मोठ्या प्रेमाने आणि आदराने स्वागत केले. या भेटीचा अनुभव खूप खास होता, कारण ही ठिकाणे सिनेमा आणि थिएटरच्या आठवणींनी भरलेली आहे. तिघे कलाकारांनी या दौऱ्यादरम्यान अभिनय, रंगभूमी आणि कला यांचा उत्सव साजरा केला.

या संवादादरम्यान संजय मिश्रा यांनी NSDमधील आपल्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला आणि सीनियर्सकडून मिळालेल्या महत्त्वाच्या शिकवणीबद्दल सांगितले—विशेषतः इरफान खान यांच्याबद्दल. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना मिश्रा म्हणाले, “मला स्वतःलाच माहित नाही की NSDमध्ये मी नेमकं काय शिकलो किंवा काय नाही, पण इरफान भाईंसारखे लोक आमच्यासोबत होते. तुम्ही फक्त त्यांना पाहत राहू शकत होतात. वीरेंद्र सक्सेना होते, अंकुरजी होते, रॉबिन दास आज इथेच समोर बसले आहेत आणि तुम्ही सगळे मोबाइलमध्ये गुंतलेले आहात.

त्यांना पाहणं हेच स्वतःमध्ये एक मोठं शिक्षण होतं. अनुप दा होते—असे कलाकार होते, ज्यांना तुम्ही सतत निरीक्षण करत राहायचात. मला आठवतं, एकदा इरफान भाई परफॉर्म करताना पाहून माझ्या मनात आलं, ‘हा माणूस अभिनय कधी सुरू करणार?’ त्या लेव्हलवर तो खेळत होता.”

त्यांच्या या शब्दांनी उपस्थित सगळ्यांनाच भावनिक केलं. NSDमध्ये शिकणं केवळ वर्गापुरतं मर्यादित नसून, मोठ्या कलाकारांना जवळून पाहून, त्यांचं निरीक्षण करूनच अभिनयाची खरी समज आणि कौशल्य विकसित होतं—हे या प्रसंगातून स्पष्ट झालं.

जसपाल सिंह संधू लिखित व दिग्दर्शित वध २ मध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता पूर्णपणे नव्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत, तर चित्रपटात पहिल्या भागातील इमोशनल आणि तात्त्विक खोली कायम ठेवण्यात आली आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स बॅनरखाली तयार झालेला हा स्पिरिच्युअल सीक्वेल २०२६ मधील सर्वाधिक चर्चित चित्रपटांपैकी एक ठरतो आहे.


Devkhel Web Series: ‘देवखेळ’ वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणी, आमदार भास्कर जाधव आक्रमक; संकासूराच्या चित्रणावरून कोकणात रोष

५६व्या IFFI 2025 मध्ये झालेल्या चित्रपटाच्या गाला प्रीमियरनंतर याचा बज आणखी वाढला. तिथे मिळालेल्या जोरदार टाळ्यांनी संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची भारतीय सिनेमातील दिग्गज ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली.लव फिल्म्सची प्रस्तुती असलेला ‘वध २’ जसपाल सिंह संधू यांनी लिहिला व दिग्दर्शित केला असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

Mardaani 3: तिसऱ्या दिवशीही राणी मुखर्जीचा चित्रपट सुस्साट; Box Office वर केली एवढ्या कोटींची कमाई!

 

Web Title: Old memories rekindled sanjay mishra opens up about irrfan khan during vadh 2 promotion at nsd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Bollywood News
  • Irfan Khan

संबंधित बातम्या

The India Story Teaser: ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ चा दमदार टीझर प्रदर्शित; रोजच्या आहारातील ‘स्लो पॉइझन’ उलगडणार
1

The India Story Teaser: ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ चा दमदार टीझर प्रदर्शित; रोजच्या आहारातील ‘स्लो पॉइझन’ उलगडणार

Sanju Rathodचं ‘गुलाबी साडी’ आता नव्या अंदाजात; ‘गुलाबी रंग’ गाण्याचा टीझर रिलीज, रितेशसोबत थिरकली ‘ही’ अभिनेत्री
2

Sanju Rathodचं ‘गुलाबी साडी’ आता नव्या अंदाजात; ‘गुलाबी रंग’ गाण्याचा टीझर रिलीज, रितेशसोबत थिरकली ‘ही’ अभिनेत्री

Prahaar Teaser Out: राजकुमार रावच्या दमदार अभिनयाने सोशल मीडियावर माजवली खळबळ; 1 मिनिट 54 सेकंदांच्या टीझरने वाढवली उत्सुकता
3

Prahaar Teaser Out: राजकुमार रावच्या दमदार अभिनयाने सोशल मीडियावर माजवली खळबळ; 1 मिनिट 54 सेकंदांच्या टीझरने वाढवली उत्सुकता

Mirzapur The Movie Teaser: कालीन भैय्याच्या साम्राज्यात नवा संघर्ष; ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर आऊट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
4

Mirzapur The Movie Teaser: कालीन भैय्याच्या साम्राज्यात नवा संघर्ष; ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर आऊट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.