(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या प्रेमकथा नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यात अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खान यांचं नातंही खूप गाजलं होतं. दोघांनी ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनमध्ये भेटून नंतर घराबाहेरही एकत्र वेळ घालवायला सुरुवात केली. मात्र, हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही आणि दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचा ब्रेकअप झाला.
यानंतर पवित्रा पुनिया पुन्हा प्रेमात पडली आहे. तिने स्वतःच याबाबत खुलासा केला आहे. ती सध्या एका बिझनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि दोघं बराच काळ एकत्र आहेत. आता दोघांनी साखरपुडा करून शिक्कामोर्तबही केला आहे.
पवित्रानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करून आपल्या नव्या प्रेमाची आणि नव्या आयुष्याची जाहीर कबुली दिली आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत खूप रोमँटिक दिसत आहे. लाल रंगाच्या गाऊनमध्ये ती नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत होती आणि तिच्या हातात हिऱ्याची अंगठीही दिसत आहे.दुसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांना मिठी मारत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एका सुंदर समुद्रकिनारी हा साखरपुडा झाला असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. पवित्रानं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा या फोटोंमधून उघड केलेला नाही. तसंच तिनं नावही सांगितलं नाहीय.
पवित्रानं साखरपुड्याच्या काही सुंदर फोटो शेअर करत आपल्या भावना मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दांत व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिलं आहे,
“लॉक इन. प्रेमानं हे अधिकृत केलंय.”असं म्हणत पवित्रा पुनिया लवकरच मिसेस होणार असल्याचंही तिनं सांगितलं आहे. तसेच यापुढे तिनं #NS असा एक हॅशटॅगही लिहिला आहे.
जावेद अख्तर मुस्लिमांबाबत असं काय म्हटलं की संतापला लकी अली?, म्हणाला,”तो माणूस ओरिजिनल नाही..”
‘बिग बॉस 14’ मध्ये एजाज खानसोबतच्या रोमांसमुळे चर्चेत असलेली पवित्रा पुनिया सध्या मुंबईतील एका बिझनेसमनसोबत डेट करत आहे, असे समजते. दोघंही खूप काळ एकत्र आहेत.