Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अक्षय खन्ना ऑस्करला पात्र आहे…’ ‘धुरंधर’ मधील रहमान डकैतची फॅन झाली फराह खान, अभिनेत्याचे केले कौतुक

सध्या सर्वांना रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाचे वेड लागले आहे. पण अक्षय खन्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या एन्ट्रीसाठी सर्वजण चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात वळत आहेत. आता, फराह खाननेही त्याचे कौतुक केले आहे

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 09, 2025 | 08:35 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रहमान डकैतची फॅन झाली फराह खान
  • ‘धुरंधर’ अभिनेत्याचे केले कौतुक
  • अक्षय खन्ना ऑस्करला पात्र – फराह
 

आदित्य धर दिग्दर्शित स्पाय अ‍ॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’ हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंगने ‘धुरंधर’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये खूप चर्चा निर्माण केली आहे. रणवीरसोबत अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अली खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या आहेत. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटातील सर्वात प्रशंसित अभिनेता अक्षय खन्ना आहे. फराह खान देखील अक्षय खन्नाच्या अभिनयाची चाहती बनली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट अक्षयच्या भूमिकेमुळे जास्त आवडला आहे. त्याच्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

कलियुगातील श्रावणबाळ, ऑन कॅमेरा व्हिलन पण खऱ्या आयुष्यात आहे सुपर हिरो, या बॉलिवुड कलाकाराला तुम्ही ओळखलं का ?

अक्षय खन्ना या चित्रपटात रहमान नावाच्या एका दरोडेखोराची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेला सर्वाधिक प्रशंसा मिळाली आहे आणि तो चित्रपटातील सर्वात मोठा आकर्षण अभिनेता बनला आहे. त्याच्या कामाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की ते फक्त अक्षयसाठी हा चित्रपट पाहणार आहेत. त्याचे काम त्याचा भूमिकेतील आकर्षित अंदाज हे सगळं चाहत्यांना खूप आवडला आहे. आता बॉलीवूडमधील फराह खान यांना देखील अक्षय खन्नाचा अभिनय आवडला आहे. तसेच, ‘तो ऑस्कर पुरस्काराला पात्र आहे’ असे देखील त्यांनी म्हटले आहे.

फराह खानने अक्षयचे केले कौतुक

रहमानची चित्रपटातील एन्ट्री एका गाण्याने सुरू होते. आता, त्याचा एन्ट्री सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणे आता एक वेड लावणारे बनले आहे. लोक त्याचा एन्ट्री सीन क्लिप करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या यादीत फराह खानही सामील झाली आहे. फराहने अक्षयचे कौतुक केले आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये धुरंधर मधील अक्षय खन्ना आणि तीस मार खानचा अक्षय कुमार दोन्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “धुरंधरमध्ये अक्षय खन्नाला रहमान डकैतच्या भूमिकेत पाहिल्यानंतर, सर्वजण…” शेवटी, फराहने लिहिले, “अक्षय खन्ना ऑस्करला पात्र आहे.”

Dhurandhar Movie: २२ वर्षीय तरुणाने ७२ तास जागून ‘धुरंधर’चा टीझर केला तयार, यामी गौतमशी आहे खास नात

चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित

आदित्य धर यांनी पहिल्या भागाच्या शेवटी खुलासा केला की ते चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करणार आहेत. “धुरंधर” चा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते आता खूप उत्साहित आहेत. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टने जबरदस्त काम केले आहे. तसेच चित्रपटामधील सगळी गाणी देखील चर्चेत आहेत.

Web Title: Farah khan impressed with akshaye khanna after watching dhurandhar says he truly deserves an oscar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Farah Khan

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.