(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सामान्य व्यक्ती नेहमीच जेव्हा मोठी वस्तू किंवा गाडी खरेदी करताना, त्या कंपनीवर आणि अर्थातच त्या गाडीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवतो. आणि मग ती गाडी खरेदी करतो. माणूस त्या कंपनीच्या ब्रँड ॲम्बेसेडरवर देखील विश्वास ठेवतो. पण, आता हा विश्वासच धोक्यात आल्याचं दिसत आहे. राजस्थानच्या भरतपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यात बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसह ह्युंदाई कंपनीच्या ६ अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हे दोन्ही स्टार अडचणीत अडकले आहेत. तसेच आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि यावर कलाकारांनी काही प्रतिक्रिया दिली की नाही हे अद्यापही समजलेले नाही आहे.
‘ठरलं तर मग’चे 900 भाग पूर्ण, पूर्णा आजीच्या आठवणीने जुई गडकरी भावूक, म्हणाली आजीच्या नावाने….
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भरतपूरमधील वकील कीर्ती सिंह यांनी हा गुन्हा दोन्ही स्टार्सवर दाखल केला आहे. कीर्ती सिंह यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ह्युंदाईची ‘अल्काजार’ ही कार खरेदी केली होती. पण पहिल्या दिवसापासूनच गाडीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असल्याचे त्यांना जाणवले. वारंवार तक्रार करूनही कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मथुरा गेट पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलाकार आले अडचणीत
आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की जर गाडी ह्युंदाई कंपनीने बनवली आहे, तर शाहरुख आणि दीपिकावर गुन्हा का दाखल झाला? कायद्यानुसार, ब्रँड ॲम्बेसेडर फक्त जाहिरातीचा चेहरा नसतात. जर एखाद्या कलाकाराने एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली आणि त्यात काही दोष आढळला, तर त्याची जबाबदारी त्या कलाकारावरही येते. कीर्ती सिंह यांचा आरोप आहे की, त्यांनी या मोठ्या कलाकारांच्या जाहिरातींवर विश्वास ठेवूनच ही गाडी खरेदी केली होती. आणि म्हणूनच शाहरुख आणि दीपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद ओक देणार मनोरंजनाचा तडका, ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी
या प्रकरणात कीर्ती सिंह यांनी सांगितलं की, त्यांनी २०२४ मध्ये जवळपास २४ लाख रुपयांची गाडी घेतली होती. गाडीच्या इंजिनमध्ये समस्या होती. वेग वाढवल्यावर आरपीएम वाढायचे, पण गाडीचा वेग वाढत नव्हता. कंपनीनेही मदत केली नाही. यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक वेळा धोका मिळाला आणि त्यांचे नुकसान झाले. गाडीच्या या मोठ्या फसवणुकीमुळे त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.