• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Prasad Oak 100th Film Vadapav Teaser Out Spicy Family Love Story

प्रसाद ओक देणार मनोरंजनाचा तडका, ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

'वडापाव' हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी घेऊन अभिनेता प्रसाद ओक परतला आहे. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 26, 2025 | 04:04 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘वडापाव’ चित्रपटाचे पोस्टर लाँच
  • प्रसाद ओकचा शंभरावा चित्रपट
  • कधी रिलीज होणार चित्रपट?
वडापाव म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या जिभेला पाणी सुटतं. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसंच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार आणि घट्ट बनतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट ‘वडापाव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. टीझरवरून हा चित्रपट एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी घेऊन आला आहे हे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असणार आहे. अभिनेता पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिका करताना दिसणार आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे.

‘इतकी वाईट मिमिक्री…’, शेट्टी अण्णा भडकले; आर्टिस्टला सगळ्यांसमोर झापले, पाहा VIDEO

चित्रपटाचा टीझर खूप मजेदार आहे. धमाल मनोरंजन आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि मोहसीन खान प्रस्तुत चित्रपट बनवण्यात आला आहे.

सिनेमॅटिक किडा बॅनर अंतर्गत, प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाचे अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. तर सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल असून संजय मेमाणे हे चित्रपटाचे छाया दिग्दर्शक आहेत. तर सिद्धार्थ साळवी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे.

‘ठरलं तर मग’चे 900 भाग पूर्ण, पूर्णा आजीच्या आठवणीने जुई गडकरी भावूक, म्हणाली आजीच्या नावाने….

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, ‘वडापाव’ एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच. हाच आमच्या चित्रपटाचा गाभा आहे. कुटुंब, त्यांच्या नात्यांतील गोडवा-तिखटपणा आणि त्यातून मिळणारा भावनिक आणि विनोदी अनुभव अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडावा, असाच आमचा प्रयत्न आहे.’ असे अभिनेता म्हणाला आहे.

तसेच, निर्माते अमित बस्नेत म्हणाले, ”मी मुळात नेपाळचा असून मला मराठी संस्कृती, खाद्यपदार्थ, साहित्य, कला यांबद्दल नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. यापूर्वी मी ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि आता ‘वडापाव’ची निर्मिती करत आहे. मराठी खाद्यपदार्थ हे मुळात भावनांशी जोडले गेलेले आहेत. वडापाव त्यापैकीच एक आहे. जीवनात आपुलकीसोबत थोडा तिखटपणा हवाच. नाहीतर नातं फिकं पडतं. हाच बॅलन्स दाखवणारा हा चित्रपट आहे. टीझर पाहूनच प्रेक्षकांना जाणवलंय की, ही कथा अगदी त्यांच्या घरासारखीच आहे. ओळखीची, तरीही नव्या चवीची.”

Web Title: Prasad oak 100th film vadapav teaser out spicy family love story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • prasad oak

संबंधित बातम्या

फक्त पद्मभूषणच नाही तर, धर्मेंद्र यांनी जिंकले ‘हे’ पुरस्कार; हिट चित्रपट देऊन मोडला स्वतःचाच रेकॉर्ड
1

फक्त पद्मभूषणच नाही तर, धर्मेंद्र यांनी जिंकले ‘हे’ पुरस्कार; हिट चित्रपट देऊन मोडला स्वतःचाच रेकॉर्ड

धर्मेंद्र यांनी कोट्यवधींची संपत्ती सोडली मागे; आता कोण होणार संपत्तीचा खरा वारस? जाणून घ्या Net Worth
2

धर्मेंद्र यांनी कोट्यवधींची संपत्ती सोडली मागे; आता कोण होणार संपत्तीचा खरा वारस? जाणून घ्या Net Worth

बॉलीवूडचा ‘ही- मॅन’ काळाच्या पडद्याआड; पत्नी हेमा मालिनी आणि लेक ईशाच्या चेहऱ्यावर दिसले दुःख
3

बॉलीवूडचा ‘ही- मॅन’ काळाच्या पडद्याआड; पत्नी हेमा मालिनी आणि लेक ईशाच्या चेहऱ्यावर दिसले दुःख

Dharmendra Passes Away: ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अधिकृत माहिती नाही
4

Dharmendra Passes Away: ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अधिकृत माहिती नाही

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur News: विमानतळाजवळचा रस्ता बंद अन् ग्रामस्थांना दहा किमीचा हेलपाटा; नागरिक आक्रमक

Kolhapur News: विमानतळाजवळचा रस्ता बंद अन् ग्रामस्थांना दहा किमीचा हेलपाटा; नागरिक आक्रमक

Nov 25, 2025 | 02:35 AM
राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी; कालमर्यादा नाही पण विलंब नको

राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी; कालमर्यादा नाही पण विलंब नको

Nov 25, 2025 | 01:15 AM
पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर

पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर

Nov 25, 2025 | 12:30 AM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM
सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण

सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण

Nov 24, 2025 | 11:23 PM
Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Nov 24, 2025 | 11:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Nov 24, 2025 | 07:12 PM
Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Nov 24, 2025 | 07:02 PM
Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Nov 24, 2025 | 06:53 PM
Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Nov 24, 2025 | 06:46 PM
Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Nov 24, 2025 | 03:11 PM
Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Nov 24, 2025 | 03:07 PM
Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Nov 23, 2025 | 06:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.