सध्या छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या मालिकेने नुकतेच 900 भाग पूर्ण केले असून मालिकेच्या संपूर्ण टीमने याबाबत सेलिब्रेशन केलं आहे. मालिकेतील फक्त अर्जुन सायलीच नव्हे तर सुभेदार कुटुंबाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये सुरु झालेल्या या मालिकेने अडीच वर्षात प्रेक्षकांची मनं जिंकली. नुतकंच मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं असल्याने त्यांची उणीव जाणवत असल्याची खंत संपूर्ण टीमने व्यक्त केली आहे. सेटवरील प्रत्येक कलाकार हा पूर्णा आजीच्या जाण्य़ाने हळहळला. अनेक कलाकारांनी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ज्योती चांदेकर यांच्या बरोबर प्रत्येकाचं नातं किती घनिष्ठ होतं हे यातून कळतं.
आज मालिकेचे 900 भाग पूर्ण झालेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा मालिकेच्या संपूर्ण टीमने लाडक्या पूर्णा आजीची पुन्हा एकदा आठवण काढली आहे. याबाबतव जुई म्हणते की, अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत टीमने मालिकेच्या यशाबाबत वृक्षरोपण केलं आहे. याबाबतची खास पोस्ट जुई गडकरीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. जुई म्हणाली की, आज ठरलं तर मगचे नाबाद 900 भाग पूर्ण झाले आहेत. आज सेट वर केक केपुन, आजीच्या नावाची “सदाफुली” लाऊन दिवस साजरा केला. ती हे बघायला हवी होती पण तिचे आशीर्वाद नक्की आहेत. तीच्या अशा अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या.. सीन फिरवावे लागले.. अजुनही आम्ही आणि कथानक यातुन सावरतोय… पण तुम्ही जी साथ देताय त्याला सलाम तुम्हाला जे बघायचंय ते लवकरच दिसेल… तोपर्यंत तुमचं प्रेम.. तुमचा “ठरलं तर मग” वरचा विश्वास… तुमची साथ अशीच राहुद्या॥जय गुरुदेव दत्त॥ अशा भावना अभिनेत्रा जुई गडकरीने व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान या सगळ्यावर तेजस्विनी पंडित म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेतकर यांच्या मुलीने देखील मालिकेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. जुईची ही पोस्ट स्टोरीला मेन्शन करत तेजस्विनी संपूर्ण टीमचं कौतुक देखील केलं आहे. तेजस्विनी म्हणाली की, “तिच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील पण, तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच राहील”, असं म्हणत तेजस्विनीने संपूर्ण टीमला धीर दिला. मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबाबत अजूनतरी कळलेलं नाही. मात्र ही भूमिका आता कोण साकारणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.