(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दाक्षिणात्य अभिनेता धनुषच्या ‘इडली कढाई’ चित्रपटाच्या सेटवर आग लागली आहे. ही घटना काल अंदिपट्टी ब्लॉकमधील अनुप्पापट्टी गावात घडली. धनुष दिग्दर्शित, सह-निर्मित आणि अभिनीत हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. आग लागण्यापूर्वी चित्रपटाचे चित्रीकरण अनुप्पापट्टी सेटवर पूर्ण झाले होते. तसेच आता अभिनेत्याच्या ‘इडली कढाई’ चित्रपटाच्या सेटवर भीषण आग लागलेली दिसून आली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पत्नीला फसवत होता सोहेल खान? सीमा सजदेहने एक्स पतीचे उघड केले धक्कादायक रहस्य, म्हणाली…
चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
धनुषची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ४ एप्रिल २०२५ रोजी धनुषने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि त्याची घोषणा केली. चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेता एका कडक शर्ट आणि धोतरात, उत्सवासारख्या अवतारात लोकांच्या गटासोबत नाचताना दिसतो आहे . यापूर्वी, हा चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, जो अजित कुमारच्या ‘गुड बॅड अग्ली’ सोबत टक्कर घेणार होता. बॉक्स ऑफिसवर टक्कर टाळण्यासाठी नंतर या चित्रपटाची डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आता कधी प्रदर्शित होणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
#WATCH | Theni, Tamil Nadu | A fire broke out at the Idly Kadai movie set yesterday in Anuppapatti village in Andipatti block. The film, directed and co-produced by Dhanush and starring the actor, is set for release later this year. The filming for Idly Kadai had completed its… pic.twitter.com/fKVSnZFeIm
— ANI (@ANI) April 20, 2025
आलिया भट्टने केले आईचे कौतुक, Yours Truly मधील सोनी यांचा अभिनय पाहून झाली भावुक!
चित्रपटातील कलाकार
हा चित्रपट ग्रामीण भागात आधारित एक भावनिक नाट्य आहे, जो ‘थिरुचिरामबलम’ नंतर धनुष आणि नित्या मेनेन यांना पुन्हा एकत्र आणणार आहे. चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, यात नित्या मेनन, अरुण विजय, शालिनी पांडे, प्रकाश राज आणि राजकिरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे सगळे प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाची कथा आणि आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आणि या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.