(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आज सर्वत्र गणेश चतुर्थी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. प्रत्येकाच्याच लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घरी झाले आहे. महाराष्ट्रात हा सण अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. भक्तगण वाजतगाजत बाप्पाचं आपल्या घरी स्वागत करतात आणि मनोभावेने बाप्पाची सेवा करतात. सामान्य जनतेप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर बाप्पासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान यांनीही बाप्पाचं स्वागत केले आहे. या दोघांनी सोशल मीडियावर बाप्पासोबतचे त्यांचे गोड फोटो शेअर केले आहेत.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संजय दत्तने खरेदी केली आलिशान कार, किंमत जाणून व्हाल चकीत
‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगे आणि लोकप्रिय क्रिकेटपटू झहीर खान यांच्याकडेही बाप्पाचे आगमन झाले आहे. मात्र यंदाचा सण त्यांच्यासाठी खूपच खास आहे. कारण त्यांच्या लेकाचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. सागरिका आणि झहीर यांचा मुलगा फतेहसिंहचा जन्म याचवर्षी १६ एप्रिल रोजी झाला. तेव्हा सागरिकाने त्यांच्या मुलाचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही. तसेच आता त्यांनी मुलाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्यांनी सहकुटुंब बाप्पाची आराधना केली आहे. हे फोटो सागरिकाने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहे. त्या तिघांना एकत्र बघून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.
सागरिका-झहीरच्या फतेहसिंगने वेधलं चाहत्यांचं लक्ष
यावेळी सागरिका आणि झहीरच्या निरागस मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्याच फोटोमध्ये तो बाप्पासाठी नैवेद्य म्हणून ठेवलेल्या मोदकांवर झडप मारताना दिसत आहे. त्याचा हा गोंडस फोटो सर्वांनाच खूप आवडला आहे. चाहते या फोटोंवर कमेंट करत फतेहसिंहचे कौतुक करत आहेत. सागरिका आणि झहीर यांनी अतिशय साधेपणाने सहकुटुंब गणेश चतुर्थीचा सण साजरा करताना दिसले आहेत. फतेहसिंह सगळ्या फोटोमध्ये खूप गोड दिसत आहे.
दरम्यान, झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांची प्रेमकहाणी एका मित्राच्या पार्टीमध्ये सुरू झाली. हे दोघेही तिथे पहिल्यांदा भेटले आणि हळूहळू जवळ आले. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांनी लग्न केले. लग्न आंतरधर्मीय असल्याने, त्यावेळी तो चर्चेचा विषय ठरला, परंतु सगळ्या संकटाना मात देत या दोघांनी एकमेकांना साथ दिली. लग्नाच्या ८ व्या वर्षी, एप्रिल २०२५ मध्ये, तिने फतेहसिंग खानला जन्म दिला. आणि येथून त्यांच्या आयुष्याला नवी सुरुवात झाली.