(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
संजय दत्त हा बॉलीवूड इंडस्ट्रीतील एक मोठा स्टार आहे. याचदरम्यन अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे नाही तर त्याच्या लक्झरी कारच्या शौकामुळे चर्चेत आला आहे. संजय दत्तने नुकतीच एक चमकदार नवीन मर्सिडीज मेबॅक GLS600 कार खरेदी केली आहे, ज्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संजय दत्तच्या या नवीन कारची किंमत जाणून कोणालाही धक्का बसेल.
संजय दत्तच्या मर्सिडीज मेबॅक GLS600 ची किंमत 3.71 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्याच्या नवीन कारचे पहिले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये, अभिनेता त्याच्या चमकदार काळ्या एसयूव्ही कारजवळ उभा असल्याचे दिसून येते. त्याने पांढरा शर्ट घातला आहे, जो तपकिरी कार्गो पँटसह स्टाईल केलेला आहे. अभिनेत्याचा हा संपूर्ण कॅज्युअल लूक खूप छान दिसत आहे.
संजय दत्तच्या नवीन कारचा व्हिडिओ व्हायरल
गाडीच्या पुढच्या ग्रिलला झेंडूच्या माळांनी सजवण्यात आले आहे आणि बोनेटवर एक लहान फुलं ठेवली आहेत. ही कार अभिनेत्याच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर उभी असलेली दिसत आहे. एका व्हिडिओ क्लिपमध्ये संजय दत्तचा ड्रायव्हर लक्झरी एसयूव्ही घरी घेऊन जात असल्याचेही दिसून आले आहे तर आजूबाजूचे लोक नवीन कारचे कौतुक करत आहेत ज्यामुळे अभिनेत्याच्या प्रभावी कलेक्शनमध्ये भर पडली आहे.
संजय दत्त ‘बागी ४’ मध्ये दिसणार
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, संजय दत्त शेवटचा ‘द भूतनी’ चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. सनी सिंग आणि मौनी रॉय देखील या चित्रपटाचा भाग होते. आता संजय दत्तचा आगामी ‘बागी ४’ चित्रपट खूप दमदार असणार आहे. यामध्ये टायगर श्रॉफ हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संजय दत्त आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बागी ४’ हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.