(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मनोरंजन उद्योगातून एक वाईट बातमी समोर आली आहे. उद्योगात मोठे योगदान देणाऱ्या एका व्यक्तीचे निधन झाले आहे. प्रसिद्ध प्रॉडक्शन डिझायनर वासिक खान यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वाशिक खान यांच्या निधनाने उद्योगात शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या कलेने इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले होते. आता ते इंडस्ट्री आणि जग दोन्ही कायमचे सोडून गेले आहेत. दिग्दर्शक अश्विनी चौधरी यांनी वासिक खान यांच्या मृत्यूची पुष्टी देखील केली आहे.
कन्नड चित्रपट इंडस्ट्री सोनू निगमवर घालणार बंदी, वादग्रस्त विधानानंतर गायक सापडला मोठ्या अडचणीत!
कुठे होणार अंत्यसंस्कार?
दिग्दर्शक अश्वनी चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘तुझी आठवण येईल भाऊ. वासिक खान यांना शांती लाभो.’ असं त्यांनी लिहिले आहे. यानंतर, दिग्दर्शकाने वासिक खानच्या अंत्यसंस्काराची माहितीही शेअर केली. त्यांनी माहिती दिली की, वसिक खान यांचे अंतिम संस्कार आज सकाळी १०.३० वाजता कब्रिस्तान मशीद, एसव्ही रोड, सनवारी बाजार कब्रस्तान येथे होणार आहे. चिंचोली गेट जवळ, मालाड पश्चिम.
You will be missed bhai . Rest in peace #WasiqKhan . Travel well. Last rites will be held today 10.30 AM , Kabrastaan Masjid, SV road , Samvari Bazar kabristaan . Near chincholi phatak , Malad West . pic.twitter.com/HR4Q67m0EK
— Ashwini Chaudhary (@DhoopAshwini) May 5, 2025
वासिक खान त्यांच्या सुरुवातीच्या काळात बॅकड्रॉप पेंटर म्हणून काम करत होते. नंतर, प्रसिद्ध कला दिग्दर्शक समीर चंदा यांना भेटल्यानंतर, त्यांनी मणिरत्नम यांच्या तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आणि येथून त्यांचे नशीब बदलले. अनुराग कश्यपच्या चित्रपटांच्या सेटवरून वासिकला खरी ओळख मिळाली. ‘दॅट गर्ल इन यलो बूट्स’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘नो स्मोकिंग’ आणि ‘गुलाल’ सारख्या चित्रपटांचे सेट तयार करून त्यांनी कथेला विशेष दृश्ये दिली. वासिक खान यांचे चित्रपटसृष्टीला मोठे योगदान लाभले आहे.
बाबिल खानच्या धक्कादायक विधानानंतरही राघव जुयालने दिला पाठिंबा; काय म्हणाला अभिनेता?
सलमान खानच्या चित्रपटांमध्ये त्यांनी केली जादू
सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटासाठी वासिकने सुमारे १०० स्केचेस बनवले होते. ‘वॉन्टेड’ मध्येही त्याने त्याच्या सेट्सची जादू निर्माण केली. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ आणि ‘रांझना’मधील त्यांच्या कामाचेही कौतुक झाले. त्यांचे सेट भव्य आणि वास्तववादी दिसत होते. ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘तनु वेड्स मनु’, ‘लम्हा’ आणि ‘तेरे बिन लादेन’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले.