Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshay Kumar चा लूक व्हायरल! रोहित शेट्टीच्या ‘Golmaal 5’चा BTS व्हिडिओ पाहून चाहते खुश

चित्रपट निर्माते रोहित शेट्टीने स्वतःच्या वाढदिवशी 'गोलमाल ५' बाबत मोठी अपडेट चाहत्यांसह शेअर केली. दिग्दर्शकाने चित्रपटाचा एक BTS व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अक्षय कुमारने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 15, 2026 | 08:27 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Akshay Kumar चा लूक व्हायरल
  • ‘Golmaal 5’चा BTS व्हिडिओ चर्चेत
  • अक्षय कुमारची ‘धांसू’ एन्ट्री
बॉलीवूड स्टार अजय देवगणचा ‘गोलमाल ५’ हा चित्रपट सध्या बरीच चर्चेत आहे. अलिकडेच ‘गोलमाल ५’ मध्ये अक्षय कुमारच्या एन्ट्रीची बातमी समोर आली होती. मात्र, निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नव्हती. दरम्यान, रोहित शेट्टीने त्याच्या वाढदिवशी ‘गोलमाल ५’ बद्दल एक मोठी अपडेट चाहत्यांना शेअर केली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करून अक्षय कुमार या चित्रपटात असणार असल्याची पुष्टी केली. या बातमीने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तसेच हा BTS व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“मिशन मुंबई” ॲक्शन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अक्षय कुमारची ‘धांसू’ एन्ट्री

चित्रपट निर्माते रोहित शेट्टीने त्याच्या लाडक्या फ्रँचायझी ‘गोलमाल ५’ चे शूटिंग सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी, त्याने त्याच्या जुहू येथील घरी चित्रीकरण सुरु केले आहे. आणि आता, १४ मार्च रोजी दिग्दर्शकाने स्वतःच्या ५२ व्या वाढदिवशी, त्याने सेटवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला. शनिवारी, रोहितने सेटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये मुख्य कलाकार अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि तुषार कपूर हे दिसत आहेत.

 

तसेच, व्हिडिओमध्ये अजय एका सरप्राईजचा इशारा देतो, त्यानंतर पहिल्या चित्रपटात लक्ष्मण प्रसाद शर्माची भूमिका करणारा शर्मन जोशी पुन्हा कलाकारांमध्ये सामील होताना दिसला आहे. पण अजय म्हणतो की, ‘खरे सरप्राईज अजून बाकी आहे. खरा सरप्राईज असे म्हणताच अक्षय कुमार टक्कल पडलेल्या लूकमध्ये भव्य एन्ट्री करताना दिसला आहे. व्हिडिओमध्ये अक्षय आणि अजय एक मजेदार क्षण शेअर करताना दिसले आहेत, जिथे अक्षय अजयच्या गालावर खेळकरपणे चुंबन घेतो आणि रोहित शेट्टीला गोंधळात टाकतो. नंतर, अक्षयसह संपूर्ण टीम ग्रुप फोटोसाठी पोझ देताना या व्हिडिओमध्ये दिसले आहेत.

Vicky Kaushal ने गाजवला ‘Zee Cine Awards’चा मंच; हत्तीवरून एन्ट्री करत मराठा शौर्याला दिली मानवंदना

रोहित शेट्टीचे हटके कॅप्शन

बीटीएस व्हिडिओ शेअर करताना रोहित शेट्टीने लिहिले, “२० वर्षांपूर्वी पहिला गोलमाल प्रदर्शित झाला होता आणि त्याने माझे आयुष्य बदलले. याचे सर्व श्रेय तुम्हाला, प्रेक्षकांना जाते. गेल्या २० वर्षांत आम्ही तुम्हाला हसवले आहे, कधीकधी निराश केले आहे, परंतु नेहमीच प्रामाणिकपणे काम केले आहे. आता, मी आणि माझी अद्भुत टीम पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘गोलमाल ५’ चे शूटिंग सुरू झाले आहे. आम्हाला नेहमीच तुमचे प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत. चित्रपटगृहांमध्ये लवकरच भेटूया.” असे लिहून रोहित शेट्टीने ही झलक चाहत्यांना दाखवली आहे. तसेच आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Golmaal 5 akshay kumar look out rohit shetty share bts video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.