Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Shetty : अभिनेत्याच्या नातीला मोदीनामाची गोडी! ‘मोदीजींमध्ये मॅजिक’ सुनील शेट्टीची धारणा, घरी होते पूजा

अभिनेते सुनील शेट्टी यांनी त्यांच्या १५ महिन्यांच्या नाती इव्हाराबद्दलचा एक भावनिक किस्सा सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इव्हारा रोज सकाळी मोदींच्या फोटोला नमस्कार करते आणि काल्पनिक लाडू अर्पण करते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2026 | 07:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

अभिनेते सुनील शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीचा आपला आदर व्यक्त करताना नात इव्हाराशी संबंधित एक भावनिक किस्सा सांगितला आहे. अवघ्या १५ महिन्यांच्या इव्हाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोबद्दल विशेष आकर्षण असल्याचा दावा त्यांनी केला. ती दररोज सकाळी मोदींच्या छायाचित्राला नमस्कार करते आणि त्यांना काल्पनिक लाडू अर्पण करते. विशेष म्हणजे, हे कोणी शिकवलेले नसून मोदींच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी विलक्षण आकर्षण असल्याचे त्यांना वाटते, असे सुनील शेट्टी म्हणाले.

‘दर्याभवानी’ मधून उलगडणार शिवरायांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

एका मुलाखतीत बोलताना सुनील शेट्टी यांनी सांगितले की, ते नरेंद्र मोदी यांचे मोठे चाहते आहेत. “मी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार करत नाही, तर एका प्रेरणादायी नेत्याविषयी बोलतो आहे. जो नेता मला प्रेरणा देतो, त्याचा मी मनापासून आदर करतो. मला माझा देश जितका प्रिय आहे, तितकेच मोदीजीही प्रिय आहेत,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नात इव्हाराचा एक रंजक अनुभवही शेअर केला. त्यांच्या मते, एकदा विमानतळावर इव्हाराच्या नॅनीने तिला मोदीजींचा फोटो दाखवत फक्त “मोदीजी” एवढेच म्हटले होते. त्यानंतर हा प्रसंग तिच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनला.

सुनील शेट्टी म्हणाले की, आता इव्हारा रोज सकाळी साईबाबांच्या एका पुस्तकात ठेवलेला मोदींचा मोठा फोटो असलेले पान उघडते. ती फोटोकडे बोट दाखवत “मोदीजी, मोदीजी” असे म्हणते. त्यानंतर घरातील गणपती बाप्पाजवळ ठेवलेला काल्पनिक लाडू उचलून तो मोदींच्या फोटोला अर्पण करते. तिच्या या निरागस कृतीने संपूर्ण कुटुंब भारावून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, इव्हाराला असे करण्यास घरातील कोणाचाही प्रभाव नाही. “मी, अथिया, केएल राहुल किंवा तिची नॅनी, आम्ही कोणीही तिला हे शिकवलेले नाही. नॅनीने फक्त एकदा फोटो दाखवून ‘मोदीजी’ असे म्हटले होते. त्यानंतर ती स्वतःहून हे करू लागली. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी खास जादू आहे, असे मला वाटते,” असे ते म्हणाले.

सुनील शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीची आठवणही यावेळी सांगितली. २०१० च्या सुमारास अहमदाबादमध्ये कामानिमित्त गेले असताना त्यांची मोदी यांच्याशी भेट झाली होती. ठरलेल्या वेळेनुसार त्यांनी भेट दिली आणि अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. भेटीच्या शेवटी त्यांनी आयुष्याविषयी काही मोलाचे विचार सांगितले, ज्यामुळे आपण भारावून गेलो होतो, असे सुनील यांनी सांगितले.

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य

दरम्यान, सुनील शेट्टी यापूर्वीही अनेक मुलाखतींमध्ये नात इव्हाराबद्दल प्रेमाने बोलले आहेत. त्यांनी इव्हाराला अथिया शेट्टीची “२.० आवृत्ती” असे संबोधले असून, सकाळचा व्यायाम संपल्यानंतर तिच्यासोबत वेळ घालवणे हा दिवसातील सर्वात आनंदाचा क्षण असल्याचेही ते सांगतात. ते इव्हाराला प्रेमाने “घरची लक्ष्मी” असे म्हणतात.

कामाच्या आघाडीवर पाहिले तर, सुनील शेट्टी यांचा ‘Welcome to the Jungle’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केल्याची चर्चा आहे.

Web Title: Granddaughter of suniel shetty worships narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • Celebrity
  • narendra modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
1

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.