
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान केवळ चित्रपटांमध्येच काम करत नाही तर त्यांची निर्मितीही करतो. अभिनेता शेवटचा ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसला होता. आता त्याने एका नवीन चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्सने बनवला आहे. या चित्रपटाचे नाव ‘हॅप्पी पटेल’ आहे. आमिर खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून ही घोषणा केली आहे. तसेच चाहत्यांना या चित्रपटाची घोषणा ऐकून खूप आनंद झाला आहे.
समुद्रकिनारी Abhijeet Sawant- Gautami Patilचा रोमान्स, रुपेरी वाळूत गाणं ‘या’ दिवशी होणार रिलीज
आमिर खानने ही घोषणा अतिशय विनोदी पद्धतीने केली आहे. वीर दास आणि मोना सिंग या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपट वीर दास यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. हा एक स्पाय-थ्रिलर चित्रपट असणार आहे, ज्याने आमिर खान स्वतः खूप प्रभावित झाला होता. अभिनेत्याला आता पुन्हा नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाची चर्चा आता चाहत्यांमध्ये सुरु आहे.
मजेदार पद्धतीने अभिनेत्याने केली घोषणा
व्हिडिओमध्ये, आमिर खान वीर दास यांना विचारताना दिसतो की तो चित्रपटातील अॅक्शन, रोमान्स आणि अगदी आयटम सोंग देखील असणार आहे. आमिर सतत या सगळ्याला प्रेक्षक कसे प्रतिसाद देतील याची काळजी करताना दिसतो आहे, तर व्हिडिओमधील इतर लोक चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा सिनेमा, कलाकार आणि कथेसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Kalki 2 चित्रपटातून Deepika Padukone बाहेर, आता प्रभास सोबत दिसणार महेश बाबूची ‘ही’ हीरोइन
चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
आमिर खान प्रॉडक्शनने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “‘क्या बनया’ पासून ‘क्या बनया’ पर्यंत, कॉमेडी, ॲक्शन, रोमान्स आणि थोडी हेरगिरीच्या एका भयानक प्रवासासाठी सज्ज व्हा. ‘हॅपी पटेल’: डेंजरस जासूस १६ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.” आमिर खान त्याचे चित्रपट खूप काळजीपूर्वक निवडतो. तो फक्त अशा कथेवर काम करतो ज्यामध्ये काहीतरी नवीन असेल. आता, लोकांना हॅपी पटेल आता किती पसंतीस पडेल हे जाणून घेऊयात.