(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटील नुकतीच नवनवीन मराठी चित्रपटामध्ये दिसली आहे. याशिवाय टेलिव्हिजनवरही तिने विविध कार्यक्रमामध्ये तिचे अभिनयकौशल्य दाखवले आहे. तसेच गौतमी आणि गायक अभिजीत सावंत याच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या दोघांते एक खास गाणं लवकरच ते घेऊन येणार असून अभिजीत ने सोशल मीडियावर एक या गाण्यामागची गोष्ट शेअर केली आहे.
अलिबाग मध्ये शूट झालेलं “रुपेरी वाळूत” हे गाणं येत्या 5 डिसेंबरला प्रेशकांच्या भेटीला येणार असून अभिजीत या गाण्यात गौतमी सोबत परफॉर्म करताना देखील बघायला मिळतोय. गायनाच्या सोबतीने अभिनयाची धुरा देखील त्याने यात पार पडली आहे.
2025 वर्ष गायक अभिजीत सावंतसाठी अगदीच खास असून या वर्षात त्याने अनेक ट्रेंडिंग गाणी केली. संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण करून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोहित केलं. कायम एव्हरग्रीन गायक असलेला अभिजीत पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्याने नुकतंच आतच्या तरुणाईसाठी मोहब्बत लुटाऊंगा या त्याचा सदाबहार गाण्याचं नवं कोर व्हर्जन देखील गायलं. अभिजीतने आजवर त्याचा आवाजाने आणि बिग बॉस मधल्या कमाल खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे येणाऱ्या काळात देखील तो अनेक वैविध्यपूर्ण आणि कमाल प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे. इंडियन आयडॉल ते आजच्या पिढीला साजेशी ट्रेंडिंग गाणी देणारा तरुणाईचा लाडका गायक ठरला आहे.समुद्रकिनारा, रुपेरी वाळूत गौतमी आणि अभिजीत यांनी शूट केलेलं हे गाणं प्रेक्षकांना मोहित करणार यात शंका नाही.
अलिकडेच गौतमीने गायक अभिजीत सावंत याच्यासोबत एक फोटो शेअर केला होता. ज्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले, आणि या दोघांचा एकत्र प्रोजेक्ट येत असल्याचे त्यांनी अंदाज लावले. परंतु आता या दोघांचा AI व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये काही खास येत आहे असे गायक अभिजीत सावंतने लिहिले होते.
गौतमी सोबत आता अभिजीत कोणतं नवीन गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन येतायत असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते.अभिजितने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदची बातमी दिली होती. दोघांच्या या AI व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाहते कंमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत.






