Hina khan (फोटो सौजन्य -Instagram)
टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने गेल्या महिन्यात तिच्या कर्करोगाची बातमी शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सगळ्या चाहत्यांना तिची काळजी वाटत आहे. अभिनेत्रीने एका दीर्घ पोस्टमध्ये सांगितले होते की ती स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. या बातमी नंतर चाहत्यांसह मोठ्या कलाकारांनी सुद्धा तिच्या साठी प्रार्थना केली आहे.
या बातमीनंतर, अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे आणि तिच्या चाहत्यांना सतत तिच्या आरोग्याचे अपडेट्स देताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा हिनाने इंस्टाग्राम हँडलवर तिचा नवीन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रुग्णालयातच्या खिडकीबाहेर बघताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांचे प्रेम आणि काळजी दोन्हींनी वाढली आहे.
हिना खानच्या डोळ्यातील आशा
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय पात्र ‘अक्षरा’ म्हणजेच अभिनेत्री हिना खान गेल्या काही काळापासून ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. गेल्या एक महिन्यापासून अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या तब्येतीची अपडेट्स देत आहे. या चित्रात, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर त्वरीत बरे होण्याची आशा आणि कुठेतरी बरे होण्याचे तेज देखील दिसून येत आहे. या फोटोमध्ये हिनाने हिरव्यारंगाचे टी-शर्ट घातले असून, हॉस्पिटलच्या खिडकीबाहेर आकाशाकडे बघताना ती दिसत आहे आणि तिने कॅप्शन लिहिले आहे – ‘है ना’ आणि हार्ट इमोजी देखील तिने या फोटोला दिला आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.
हिनासाठी चाहते करतायत प्रार्थना
हिना खानच्या या पोस्टवर अभिनेत्रीचे मित्र आणि चाहते कमेंट करताना आणि तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले- प्रत्येक रात्रीनंतर एक दिवस उजाडतो, तू एक मजबूत महिला आहेस. असे त्याने लिहिले. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले- लवकर बरे व्हा. तिसऱ्या चाहत्याने लिहिले- होय, प्रत्येक काळ्या ढगात आशेचा किरण असतो. याशिवाय अनेक चाहत्यांनी तिच्या लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. आणि तिच्या लवकरात लवकर बरे होण्याची वाट पाहत आहेत.
कामाच्या आघाडीवर, अभिनेत्री हिना खानने 2009 पासून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये काम करायला सुरुवात केली, त्यानंतर ती ‘बिग बॉस 11’ आणि ‘बिग बॉस 14’ सारख्या शोमध्ये दिसली. याशिवाय तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले. कॅन्सरमुळे हिनाला एका मोठ्या प्रोजेक्टमधून बाहेर काढल्याचे नुकतेच सांगितले जात आहे. आता हिना खान लवकरात लवकर बारी व्हावी हीच चाहत्यांची इच्छा आहे. आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती लवकर सज्ज झाली पाहिजे अशी त्यांची आशा आहे.