(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड स्टार सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. त्याने नुकताच आता एक दिवाळी सेलिब्रेशनमधील एक फोटो पोस्ट केला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोमध्ये इब्राहिम त्याचे दोन्ही भाऊ तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान (जेह) सोबत दिसत आहे. चाहते या तिघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटो चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
इब्राहिम अली खानने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आणि त्याचे दोन्ही भाऊ दिवाळीच्या उत्साहात आणि सजावटीमध्ये एकत्र हसत असल्याचे दिसत आहे. इब्राहिम काळ्या शेरवानीत खूपच हँडसम दिसत आहे. तर तैमूरने लाल कुर्ता परिधान केला आहे. दरम्यान, एका हातात बाटली धरून धाकटा भाऊ जेहने त्याच्या खेळकर भावनेने सर्वांची मने जिंकली आहे. हे तिघेही फोटोमध्ये खूप आनंदी आणि मस्ती करताना दिसत आहेत.
‘या’ दिवाळीत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा करणार पहिल्या बाळाचे स्वागत, अभिनेत्री रुग्णालयात दाखल
इब्राहिम अली खानने एक मजेदार कॅप्शनसह ही पोस्ट शेअर केली आहे. फोटोला कॅप्शन देताना इब्राहिम अली खानने लिहिले, “‘तीनों भाई, तीनों तबाही’.” या हॅशटॅगसह त्याने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला. हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे, युजर्स या तिन्ही भावंडांना सर्वात गोंडस त्रिकूट म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.
इब्राहिम हा सैफ आणि अमृताचा मुलगा
इब्राहिम अली खान हा सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा आहे. तैमूर आणि जेह हे सैफ आणि करीनाचे मुलगे आहेत. या तिन्ही भावांमध्ये एक खास नाते आहे आणि ते अनेकदा कौटुंबिक कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये एकत्र दिसले आहेत. इब्राहिमने या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘नादानियां’ या प्रेमकथेच्या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात खुशी कपूर, सुनील शेट्टी, महिमा चौधरी, दिया मिर्झा आणि जुगल हंसराज यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
दिवाळीनिमित्त Sunny Deolचा धमाका, वाढदिवशी जाहीर केला नवीन चित्रपट, कधी होणार रिलीज?
‘सरजमीं’मधील भूमिकेसाठी इब्राहिमचे कौतुक
यानंतर, इब्राहिम अली खानने ‘सरजमीं’ या अॅक्शन-ड्रामा चित्रपटात काम केले, ज्यामध्ये पृथ्वीराज सुकुमारन आणि काजोल यांनी सह-अभिनय केला होता. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु, इब्राहिम अली खानने अद्याप त्याच्या पुढील प्रकल्पाची घोषणा केलेली नाही. परंतु, चाहते त्याचा नवा प्रोजेक्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.