Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: तिसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात येणार वाइल्ड कार्ड? प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

'बिग बॉस मराठी 6'च्या घरात आता लवकरच वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार असल्याचे समजले आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 26, 2026 | 03:39 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘बिग बॉस’च्या घरात येणार वाइल्ड कार्ड?
  • प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
  • खरंच वाइल्ड कार्ड की बिग बॉसचा डाव?
‘बिग बॉस मराठी 6’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोने आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी नृत्यांगना राधा पाटील घराबाहेर पडली. आणि तिचे चाहते नाराज झाले. विशेष म्हणजे, राधा ही या पर्वातून एलिमिनेट होणारी पहिलीच स्पर्धक ठरली आहे. तिची एक्झिट अनेकांसाठी धक्कादायक होती. तसेच तिला घराबाहेर पडताना पाहून घरातील सदस्य देखील भावुक झालेले दिसले.

”कधी पाय, कधी जीभ…”, या आजाराशी झुंज देतोय Hrithik Roshan, पोस्ट करत म्हणाला…

राधाच्या एलिमिनेशननंतर घरात उर्वरित 16 स्पर्धक आता राहिले आहेत. आणि आता अशातच आणखी एक मोठा ट्विस्ट ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळणार आहे. ज्याने ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक सदस्यांची झोप उडणार आहे. अलिकडेच कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका प्रोमोमुळे वाइल्ड कार्ड एन्ट्रीची होणार असल्याचे म्हटले आहे. आता हा वाइल्ड कार्ड सदस्य नक्की कोण आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

 

वाइल्ड कार्ड प्रोमोने उडवली खळबळ

‘बिग बॉस मराठी 6’च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य लिव्हिंग रूममधील स्क्रीनसमोर बसलेले दिसत आहेत. तेवढ्यात बिग बॉस घोषणा करतात की, “आता येत आहेत बिग बॉस मराठी सीझन 6 चे पहिला वाइल्ड कार्ड सदस्य…” यानंतर घरातील फिरता दरवाजा उघडताना दाखवला आहे. दरवाजा उघडताच काही स्पर्धक टाळ्या वाजवताना, काही गोंधळलेले तर काही पूर्णपणे आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मात्र, वाइल्ड कार्ड म्हणून नेमकं कोण येणार, हे सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागातच स्पष्ट होणार आहे.

‘हेच जिवंत असताना का नाही केलंत…?’ सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री दिल्याबद्दल Sumeet Raghavan ची नाराजी

खरंच वाइल्ड कार्ड की बिग बॉसचा डाव?

हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच कमेंट सेक्शनमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या आवडत्या कंटेंट क्रिएटर्स आणि सेलिब्रिटींची नावे सुचवली आहेत. मात्र, खरंच वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार की बिग बॉस नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसाठी एखादा ट्विस्ट प्लॅन करत आहेत, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

आधीच्या पर्वांचा विचार केला, तर ‘बिग बॉस मराठी’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री सहसा उशिरा झालेली पाहायला मिळते. मागील पर्वात बॉडीबिल्डर संग्राम चौगुले सहाव्या आठवड्यात वाइल्ड कार्ड म्हणून घरात दाखल झाला होता. त्याआधी अभिनेत्री स्नेहलता वसईकर पाचव्या आठवड्यात वाइल्ड कार्ड म्हणून आली होती. त्यामुळे यंदा तिसऱ्याच आठवड्यात वाइल्ड कार्ड येईल का, याबाबत प्रेक्षकांमध्ये साशंकता कायम आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 first wildcard promo out who is new contestant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
2

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
3

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
4

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.