(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
२ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या “कांतारा: चॅप्टर १” ने पहिल्या दिवशी भारतात ६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असाधारणपणे चांगली कामगिरी करत आहे, कलेक्शनच्या बाबतीत बॉलीवूडचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपटाला मागे टाकून हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. “कांतारा: चॅप्टर १” ने रिलीजच्या चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे आपण जाणून घेणार आहोत.
“कांतारा: चॅप्टर १”ची चौथ्यादिवशीची कमाई
ऋषभ शेट्टीचा “कांतारा: चॅप्टर १” भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. वादळापेक्षाही वेगाने कमाई करणाऱ्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत १६२.८५ कोटींची कमाई करून, बाकीच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. शनिवारी, या चित्रपटाने ५५ कोटींची कमाई केली, जी शुक्रवारच्या ४५.४ कोटींपेक्षा जवळपास २० टक्के जास्त आहे. रविवारी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती आणि चौथ्या दिवशीही चित्रपटाने बंपर कमाई केली.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘कांतारा: चॅप्टर १’ ने रविवारी, रिलीजच्या चौथ्या दिवशी ₹६१.०० कोटींची कमाई केली. यासह, चित्रपटाची एकूण ओपनिंग वीकेंडची कमाई ₹२२३.२५ कोटींवर पोहोचली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडत आहे. तसेच त्याला भरभरून प्रतिसाद देखील ते देत आहेत.
‘कांतारा: चॅप्टर १’ ने ओजी, लोका सारख्या चित्रपटांना मागे टाकले
रविवारी, ‘कांतारा: चॅप्टर १’ ने जास्त कमाई करून, बॉलीवूडचा ‘सितारे जमीन पर’ (₹१६७ कोटी), ‘दे कॉल हिम ओजी’ (₹१७९ कोटी) आणि ‘लोका चॅप्टर १’ (₹१५३ कोटी) यासह अनेक चित्रपटांना मागे टाकून नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. शिवाय, चित्रपटाने केजीएफ: चॅप्टर १ (₹१८५ कोटी) च्या देशांतर्गत कलेक्शनला मागे टाकले आहे. यासह, तो केजीएफ: चॅप्टर २ (८६० कोटी रुपये) आणि कांतारा (३१० कोटी रुपये) नंतर भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला आहे.
Bigg Boss 19: ‘या’ आठवड्यात ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेटेड, कोण जाणार ‘बिग बॉस’च्या घराबाहेर?
‘कांतारा: चॅप्टर १’ चे बजेट किती आहे?
ऋषभ शेट्टीचा प्रीक्वल १२५ कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या मोठ्या रिलीजने अवघ्या चार दिवसांत त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एखादा चित्रपट त्याच्या दुप्पट खर्चानंतरच हिटचा दर्जा मिळवतो. याचा अर्थ असा की कांतारा: चॅप्टर १ आधीच यशस्वी झाला आहे आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर २५० कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर तो हिट घोषित केला जाणार आहे. अशा आहे की चित्रपट सोमवारच्या कसोटीतही अव्वल स्थान मिळवेल आणि हिटचा टप्पा गाठेल.
‘कांतारा: चॅप्टर १’ बद्दल
‘कांतारा: चॅप्टर १’ हे ऋषभ शेट्टी यांनी लिहिले आहे आणि दिग्दर्शित केले आहे, जे चित्रपटात देखील काम करतात. या चित्रपटात जयराम, रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया, प्रमोद शेट्टी आणि प्रकाश थुमिनद यांच्याही भूमिका आहेत. सगळ्यांच्या तंगड्या भूमिका पाहून चाहते देखील चकीत झाले आहेत.