Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करण जोहर आणि गुनीत कपूरचा ‘ग्यारह ग्यारह’ कालचक्राचे बंधनं मोडायला सज्ज, ZEE5 वर ट्रेलर प्रदर्शित!

सह-निर्मिती करण जोहर आणि गुनीत मोंगा कपूर यांचा ‘ग्यारह ग्यारह’ या चित्रपटाचा ट्रेलर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटामध्ये राघव जुयाल, कृतिका कामरा आणि धैर्य कारवा या सर्व कलाकारांसह अभिनीत हा 'ग्यारह ग्यारह’ चित्रपटाचा प्रीमियर 9 ऑगस्ट रोजी ZEE5 वर पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 29, 2024 | 11:18 AM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

“काळ हे एक सपाट वर्तुळ आहे”, असे एकदा नीत्शेने म्हटले जाते. पण जर ते वर्तुळ वाकवले, वळवले आणि चलाखीने हाताळले तर? भारतातील सर्वात मोठा आवडला जाणारा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ZEE5 वर ‘ग्यारह ग्यारह’ या चित्रपटाची चित्तथरारक कथा घेऊन प्रेक्षकांच्या समोर मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. करण जोहर आणि गुनीत मोंगा कपूरची सह-निर्मिती असलेला हा सिनेमा 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून भूतकाळाला मात देत वर्तमान आणि भविष्य बदलण्याच्या शक्यतेबाबत प्रेक्षकांना प्रश्नात पडणारा हा चित्रपट त्यांच्या भेटीस येणार आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना अशा जगात घेऊन जातो जिथे अशक्य गोष्टी शक्य होतात. ज्यामुळे काळाचे अस्तित्व आणि सामर्थ्याबद्दल आश्चर्य वाटते. दूरदर्शी दिग्दर्शक उमेश बिष्त दिग्दर्शित ‘ग्यारह ग्यारह’ मध्ये कृतिका कामरा, धैर्य कारवा आणि राघव जुयाल यांच्या प्रमुख भूमिका असून गौतमी कपूर, हर्ष छाया, पूर्णेन्दु भट्टाचार्य, मुक्ती मोहन, गौरव शर्मा यांच्यासारखे सहकलाकार देखील या चित्रपटामध्ये चांगलेच झळकताना दिसणार आहेत.

वेगवेगळ्या कथानकांवर प्रयोग करणारे ‘मल्टी-हायफेनेट’ म्हणून लोकप्रिय, करण जोहर आणि धर्मॅटिक एंटरटेनमेंटचा अपूर्व मेहता तसेच ऑस्कर विजेत्या सिने- निर्मात्या गुनीत मोंगा कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच सिख्या एंटरटेनमेंटचे अचिन जैन यांनी सह-निर्मिती केली आहे. ‘ग्यारह ग्यारह’ हा चित्रपट एका रहस्यमय वॉकी-टॉकीद्वारे जोडलेल्या वेगवेगळ्या कालखंडातील दोन पोलिस अधिकाऱ्यांची मनोरंजक कथा आणि भूत- वर्तमानावर त्याचा होणारा बटरफ्लाय इफेक्ट या वर आधारित ही कथा आहे.

 

1990 च्या दशकातील धैर्य कारवा यांनी साकारलेला एक वरिष्ठ गुप्तहेर शौर्य अंतवाल आणि राघव जुयाल यांनी साकारलेला एक तरुण पोलिस अधिकारी युग आर्यच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हे दोघेही एका गोंधळात टाकणाऱ्या संप्रेषण साधनाशी जोडले जातात. आणि रात्री 11:11 वाजता क्षणभंगुर 60 सेकंदांसाठी ही विचित्र घटना घडून येते. तसेच या चित्रपटाच्या केंद्रस्थानी कृतिका कामराने साकारलेली एक दृढनिश्चयी महिला वामिका रावत आहे. जी तरुण पोलिस अधिकारी युग आर्यला मार्गदर्शन करते आहे. ही सगळी थरारक कथा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा अनुभव घेताना मज्जा येणार आहे.

या चित्रपटाबद्दल सांगताना कृतिका कामरा म्हणाली, ‘ग्यारह ग्यारह’ च्या जगात पाऊल टाकणे हा माझ्यासाठी एक आनंददायी प्रवास होता. ही भूमिका मी यापूर्वी केलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा वेगळी आहे. यामुळे मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडले असं म्हणता येईल. या चित्तथरारक सिनेमात पोलिसाची भूमिका साकारणे रोमांचक आणि आव्हानात्मक होते. शिवाय, करण जोहर आणि गुनीत मोंगा कपूर यांच्यासारख्या दूरदर्शी कलाकारांसोबत काम करणे म्हणजे एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. त्यांचे सेटवरील मार्गदर्शन आणि सर्जनशील ऊर्जा खरोखरच प्रेरणादायी होती. ZEE5 च्या प्रेक्षकांसमोर कधी एकदा ही अनोखी कथा उलगडते असं झाले आहे. हे कथानक वेळ, गूढता आणि मानवी भावनांची अनपेक्षित मार्गाने सरमिसळ करते. ज्यामुळे कार्यक्रमाचा कथाकथन उलगडण्याचा आलेख खरोखरच अद्वितीय आणि रोमांचक बनतो.” असे तिने या चित्रपटाबद्दल सांगितले.

हे देखील वाचा- ‘नेता गीता’ मधील “मन प्रेमात रंगले” पहिल गाणं झाले लाँच, २३ ऑगस्टपासून होणार प्रदर्शित!

तसेच या चित्रपटाबद्दल सांगताना राघव जुयाल म्हणाला की, “ग्यारह ग्यारह” या चित्रपटाचा भाग होणे हा माझ्यासाठी एक परिवर्तनशील अनुभव ठरला. माझ्या प्रवासाची सुरुवात एका टीव्ही रिअॅलिटी शोमधून झाली. अखंडपणे होस्टिंग आणि विनोदी भूमिकांमध्ये झळकण्याची संधी मिळाली. आता, मी बॉलीवूड क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवत असताना, माझी क्षमता ओळखल्याबद्दल आणि मला गंभीर तसेच आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल मी गुनीतचा मनापासून आभारी आहे. पहिल्याच प्रयत्नांत एका पोलीस अधिकाऱ्याचे चित्रण म्हणजे एक महत्त्वाची जबाबदारी असल्यासारखं वाटते. माझ्या नेहमीच्या कामगिरीपेक्षा ही एक मोठी झेप आहे आणि या संधीसाठी मी आभारी आहे. यामुळे मला माझ्या अभिनय क्षमतेची एक वेगळी बाजू दाखवता येईल आणि ‘Gyaarah Gyaarah’च्या माध्यमातून आम्ही काय तयार केले आहे हे ZEE5 च्या प्रेक्षकांसमोर येण्यासाठी आणखी वाट मी पाहू शकत नाही. हा माझ्याकरिता आणि प्रेक्षकांसाठी देखील एक संपूर्ण नवीन अनुभव असेल, ही आशा करतो! “असे त्याने सांगितले.

‘ग्यारह ग्यारह’ या चित्रपटाचा आता नुकताच ट्रेलर रिलीज झाला असून, चाहत्यांचा या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तसेच ही चित्तथरारक कथा पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. आता ‘ग्यारह ग्यारह’ 9 ऑगस्टपासून ZEE5वर स्ट्रीमिंग होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद देतील यात शंकाच नाही.

Web Title: Karan johar and guneet kapoor gyaarah gyaarah is set to break the bounds of time trailer released on zee5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 11:18 AM

Topics:  

  • karan johar

संबंधित बातम्या

‘Dhadak 2’ झाला फ्लॉप? ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे जाणून घ्या ५ दिवसांचे कलेक्शन
1

‘Dhadak 2’ झाला फ्लॉप? ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे जाणून घ्या ५ दिवसांचे कलेक्शन

Dhadak 2 Trailer: हृदयाला भिडेल असा आहे ‘Dhadak 2’ चा ट्रेलर, तृप्ती आणि सिद्धांतच्या जोडीने जिंकले मन
2

Dhadak 2 Trailer: हृदयाला भिडेल असा आहे ‘Dhadak 2’ चा ट्रेलर, तृप्ती आणि सिद्धांतच्या जोडीने जिंकले मन

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीच्या ‘धडक २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
3

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीच्या ‘धडक २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘ You’re cheater…’, ‘The Traitors’ च्या पहिल्या सीझनची विजेती होताच उर्फी जावेद ट्रोल, नेटकरी संतापले
4

‘ You’re cheater…’, ‘The Traitors’ च्या पहिल्या सीझनची विजेती होताच उर्फी जावेद ट्रोल, नेटकरी संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.