
(फोटो सौजन्य - x अकाउंट)
चित्रपट निर्माता करण जोहर “द ट्रेटर्स” या रिॲलिटी शोमध्ये होस्टिंग करताना दिसला, ज्यामुळे तो चर्चेत आला. त्याने हा शो उत्तम प्रकारे होस्ट केला. गुरुवारी एशियन अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२५ मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट होस्टचा पुरस्कार चित्रपटात निर्मात्याने मिळवला आहे. तसेच “द ट्रेटर्स” या शो मधील त्याची होस्टिंग देखील चाहत्यांना खूप पसंत पडली. आणि आता तो सर्वोत्कृष्ट होस्ट पुरस्कारामुळे आणखी प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. चित्रपट निर्मात्याने सोशल मीडियावर काय पोस्ट शेअर केली आहे पाहुयात.
स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत पलक मुच्छलचं सूचक वक्तव्य; म्हणाली ‘कुटुंब कठीण काळातून…’
करण जोहरला सर्वोत्कृष्ट होस्टचा पुरस्कार प्राप्त
हा पुरस्कार जिंकल्यानंतर करण जोहरने इन्स्टाग्रामवर आपला आनंद व्यक्त केला. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “सिंगापूरमधील एशियन अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये ‘द ट्रेटर्स’साठी सर्वोत्कृष्ट होस्टचा पुरस्कार जिंकून मला खूप आनंद झाला आहे. मी मॅराकेश फिल्म फेस्टिव्हलमध्ये होतो, त्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही. याबद्दल मी अकादमीचे आभार मानू इच्छितो.” असे लिहून करणने आपला आनंद व्यक्त करून त्यांचे आभार मानले आहे.
“ब्लॅक वॉरंट” नेही मिळवला पुरस्कार
प्राइम व्हिडिओच्या “द ट्रेटर्स” ला एशियन अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२५ मध्ये “बेस्ट अॅडॉप्टेशन ऑफ अॅन एक्झिस्टिंग फॉरमॅट” साठी पुरस्कार मिळाला. तान्या छाब्रियाला नेटफ्लिक्स मालिका “ब्लॅक वॉरंट” साठी सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला. या बातमीने देखील भारतीय चाहते खुश झाले आहेत. तसेच, सिंगापूरची अभिनेत्री आयव्हरी चियाला या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चीनने “मुमु” साठी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म आणि “स्ट्रेंज टेल्स ऑफ टँग डायनेस्टी: सेकंड टू द वेस्ट” साठी सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीजचा पुरस्कार जिंकला.
Dhurandhar: रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ प्रेक्षकांचे उडवणार होश; जाणून घ्या चित्रपटाचा पहिला Review
जपान आणि सिंगापूरने सर्वाधिक पुरस्कार जिंकले
जपान आणि सिंगापूरने प्रत्येकी सहा पुरस्कारांसह यादीत सहभाग घेतला. कोरिया आणि भारताने प्रत्येकी पाच पुरस्कारांसह दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान मिळवले. चीन आणि हाँगकाँग एसएआरने प्रत्येकी चार पुरस्कार जिंकले, तर तैवानने तीन पुरस्कार जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि फिलीपिन्सने प्रत्येकी दोन पुरस्कार जिंकले, तर थायलंडने एक पुरस्कार जिंकला आहे.