(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
संगीत दिग्दर्शक-चित्रपट निर्माते पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना या दोघांचे लग्न आता पुढे ढकल्यामुळे हे दोघेही सतत चर्चेत आहेत. सोशल मीडियापासून ते बातम्यांच्या हेडलाईनपर्यंत, त्यांच्या लग्नाबद्दल सतत चर्चा होत असताना दिसत आहे. सर्वांना माहिती आहे की पलाश आणि स्मृतीचे लग्न शेवटच्या क्षणी पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान, पलाशची बहीण पलक मुच्छलने या जोडप्याच्या लग्नाबद्दल तिचे मौन सोडले आहे. पलाश-स्मृती लग्न पुढे ढकल्यानंतर ११ दिवसांनी त्याच्या बहिणीने यावर सांगितले आहे. पलक नक्की काय म्हणाली आपण जाणून घेणार आहोत.
पलक काय म्हणाली?
खरं तर, पलक मुच्छल अलीकडेच फिल्मफेअरशी याबद्दल चर्चा करताना दिसली आहे. पलाश आणि स्मृतीच्या लग्नाबद्दल विचारले असता, पलक म्हणाली, “मला वाटते की कुटुंबे खूप कठीण काळातून जात आहेत आणि या काळात आम्ही सकारात्मकतेवर अवलंबून आहोत.” पलक पुढे म्हणाली, “आम्ही शक्य तितके सकारात्मकता विचार पसरवत आहोत आणि मजबूत राहत आहोत.” असे गायिका म्हणाली आहे.
७ डिसेंबरला होणार होते लग्न?
पलाश आणि स्मृतीच्या लग्नाबाबत विविध अफवा पसरत आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. काही दिवसांपूर्वी, हे जोडपे ७ डिसेंबर रोजी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले होते, परंतु स्मृतीच्या भावाने या अफवांचे खंडन केले आणि त्या सर्व खोट्या असल्याचे सांगितले. पलाशच्या बहिणीनेही या भावनेला दुजोरा देत म्हटले आहे की, दोन्ही कुटुंबांसाठी हा कठीण काळ आहे. आता या दोघांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
Year in Google Search 2025 : धर्मेंद्र जिवंत आहेत की नाही? २०२५ मध्ये Google वर सर्वाधिक होतेय सर्च
शेवटच्या क्षणी लग्न केले रद्द
पलाश आणि स्मृतीचे लग्न शेवटच्या क्षणी रद्द होणार होते. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर, पलाशचे एका मुलीशी असलेले चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे एक नवीन वळण आले आणि पलाश सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. तसेच या व्हायरल होणाऱ्या चॅट्समुळे तो अडचणीत अडकला आणि सोशल मीडियावर गोंधळ उडाला. पलाशची चॅट व्हायरल झालीच, पण स्मृतीने तिच्या सोशल मीडियावरून लग्नाचे फोटोही डिलीट केले, ज्यामुळे पलाशने तिची फसवणूक केल्याचा अंदाज वर्तवला जात होता. हे दोघे लग्न करतील की नाही हे अद्यापही समजलेले नाही आहे.






