
भारताच्या पदरी निराशा! Homebound ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर (Photo Credit- X)
India’s #Homebound Misses Out on International Feature Film Nomination.#Oscars pic.twitter.com/0uQZgQgI08 — Gulte (@GulteOfficial) January 22, 2026
अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने गुरुवारी संध्याकाळी ही यादी प्रसिद्ध केली. ‘होमबाउंड’ची निवड ‘आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीमध्ये टॉप १५ चित्रपटांच्या यादीत झाली होती. त्यामुळे हा चित्रपट अंतिम नामांकनापर्यंत पोहोचेल, अशी मोठी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, अंतिम ५ चित्रपटांमध्ये या भारतीय चित्रपटाचा पत्ता कट झाला आहे.
मुनमुन स्पष्टच बोलली! TMKOC फेम बबिताला व्हायचं नाही आई… कारण ऐकून व्हाल थक्क
१. द सीक्रेट एजंट – ब्राझील
२. इट वॉज जस्ट अ ॲक्सिडेंट – फ्रान्स
३. सेंटिमेंटल वैल्यूज – नॉर्वे
४. सिरात – स्पेन
५. द व्हॉइस ऑफ हिंद रजब – ट्युनिशिया
चित्रपट शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर निर्माता करण जोहरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याने दिग्दर्शक नीरज घायवान यांचे कौतुक करत म्हटले की, “नीरज घायवान, तुमचा अभिमान आहे. मला या चित्रपटाचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद. यावर नीरजनेही प्रतिक्रिया देत करणचे आभार मानले आणि सांगितले की, “तुमच्या पाठिंब्याशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो.
नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट दोन जिवाभावाच्या मित्रांची गोष्ट आहे, जे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपले गाव सोडतात. मात्र, ध्येयापर्यंत पोहोचताना त्यांच्या आयुष्यात आणि मैत्रीत येणारे बदल या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये या चित्रपटाचे विशेष कौतुक झाले होते. जरी ‘होमबाउंड’ला ऑस्कर नामांकन मिळाले नसले, तरी टॉप-१५ पर्यंत पोहोचणे ही भारतीय सिनेमासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.