Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिक आर्यनने सांगितली वैयक्तिक आयुष्याबाबत खास गोष्ट, म्हणाला- ‘मी सिंगल आहे कारण…’

'भूल भुलैया 3' अभिनेता कार्तिक आर्यनने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याच्या वैयक्तिक नातेसंबंधाची स्थिती उघड केली आहे. अभिनेत्याने तो सिंगल असल्याचे सांगितले असून त्याचे कारण स्पष्ट केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 05, 2024 | 03:35 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘भूल भुलैया 3’मध्ये रुह बाबा आणि मंजुलिका म्हणजेच विद्या बालन यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. तो म्हणाला की, सध्या तो सिंगल आहे. आणि अभिनेत्याने याचे कारण देखील स्पष्ट केले आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसवर सोडले मौन
अभिनेता कार्तिक आर्यनने अलीकडेच मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी सिंगल आहे आणि आता मला माझे लाइव्ह लोकेशन कोणालाही पाठवण्याची गरज नाही. मी आता माझ्या डेटिंग ॲप्सवर देखील उपस्थित नाही. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर, मी जेव्हा पासून चंदू चॅम्पियनची तयारी सुरू केली होती आणि त्यासाठी शूटिंग सुरू केले, तेव्हापासून माझ्याकडे वेळच नाही आहे.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे. कार्तिक आर्यनचे नाव याआधी सारा अली खान, अनन्या पांडेसह अनेक अभिनेत्रींसह जोडले गेले होते. मात्र, ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर सारा आणि कार्तिकचे ब्रेकअप झाले. तर अनेकदा कार्तिकचे नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींसह जोडण्यात आले होते. मात्र आता आपण पूर्णतः सिंगल असल्याचे कार्तिकने सांगितले आहे.

हे देखील वाचा – बॉलिवूडचा तो हिट चित्रपट ज्यात हिरो एकही डायलॉग बोलला नाही

विद्या बालनने एक इशारा दिला होता
अलीकडेच विद्या बालनने कार्तिक आर्यनला डेट करण्याचे संकेत दिले होते. अभिनेत्रीने द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये सांगितले होते की, ‘कार्तिक सेटवर फोनवर नेहमी व्यस्त असायचा आणि लव्ह यू वगैरे म्हणत असे’. हे ऐकून अभिनेता लाजू लागला. आणि अनेक महिला चाहत्यांचे हृदय तुटले. आता अभिनेता त्याच्या भूल भुलैया ३ चित्रपमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 1 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने चार दिवसांत 120 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

हे देखील वाचा – Bhool Bhulaiyaa 3 Box Office Day 4: ‘मंजुलिका’ने सोमवारच्या कसोटीत ‘सिंघम अगेन’ला दिली दमदार टक्कर!

भूल भुलैया ३ मधील कलाकार
भूषण कुमार निर्मित भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन रूह बाबा म्हणून परतला आहे. चित्रपटात तृप्ती डिमरी, राजपाल यादव, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन मंजुलिका यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांना सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे सस्पेन्स. शेवटचा सस्पेन्स धक्कादायक आहे. आणि म्हणून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि चाहत्यांच्या पसंतीस हा चित्रपट पडला आहे.

Web Title: Kartik aaryan says i am single i dont have time to send live location to anyone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • bhool bhulaiyaa 3
  • Kartik Aaryan

संबंधित बातम्या

‘बॉलीवूडमधील सगळ्यात वाईट नट, त्याला धड…,’ प्रशांत नारायणन यांनी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर केली टीका
1

‘बॉलीवूडमधील सगळ्यात वाईट नट, त्याला धड…,’ प्रशांत नारायणन यांनी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर केली टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.