मनोरंजनाच्या दुनियेत प्रत्येक वर्षी नवनवीन चित्रपट रिलीज होत असतात. यातील काही चित्रपट हिट ठरतात तर काही फ्लॉप. आजवर लाखो चित्रपट रिलीज झाले मात्र यातील फार कमी चित्रपट असे होते ज्यांनी शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या मनात आपली पकड मजबूत ठेवली. यातीलच एका चित्रपटाविषयी आपण जाणून घेणार आहोत. हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वात हिट चित्रपट ठरला मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यात हिरोला एकही डायलॉग देण्यात आला नव्हता.
बॉलिवूडचा तो हिट चित्रपट ज्यात हिरो एकही डायलॉग बोलला नाही
या चित्रपटाचे नाव आहे 'बर्फी'. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चितपटात रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा आणि इलिआना डिक्रुझ दिसून हे अभिनेते दिसून आले
चित्रपटात रणबीरने बर्फीची भूमिका निभावली होती, जो ऐकू-बोलू शकत नव्हता. चित्रपटातील रणबीरच्या परफॉर्मन्सची भरभरून प्रशंसा करण्यात आली होती
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनुराग बासु यांनी केले होते. हा चित्रपट एक हिट चित्रपट ठरला होता
चित्रपटाची विशेष बाब म्हणजे, यात मुख्य कॅरेक्टर म्हणजेच रणबीर कपूरला एकही डायलॉग देण्यात आला नव्हता
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने देशभरात 112 कोटींची कमाई केली होती तर या चित्रपटाने वर्ल्डवाइड 188 कोटींची कमाई केली होती
'बर्फी' चित्रपटाला IMDB'वर देखील तगडी रेटिंग देण्यात आली होती. याला 10 पैकी 8 रेटिंग देण्यात आली आहे
ही एक रोमँटिक कॉमेडी मुव्ही आहे. नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राइमवर तुम्ही या चित्रपटाचा आनंद लुटू शकता