
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे आणि आता प्रभासच्या कल्की २८९८ एडी मध्ये काम केल्यानंतर, तिने हिंदी प्रेक्षकांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेतले आहे. गेल्या वर्षी अभिनेत्री महानती चित्रपटामध्ये दिसली. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, तिला थलापती विजय आणि चिरंजीवी यांच्यातील सर्वोत्तम डान्सर कोण हे निवडण्यास सांगितले होते. परंतु, तिच्या उत्तरामुळे वाद आणि निषेध निर्माण झाला. चाहत्यांना तिचे उत्तर फार पसंत पडले नाही.
Orry ची साडे सात तास चौकशी, 252 कोटींचा ड्रग्ज घोटाळा प्रकरण; असमाधानकारक उत्तर दिल्याची माहिती
कीर्ती सुरेशने थलापती विजयला चिरंजीवीपेक्षा चांगला डान्सर म्हटले होते. चिरंजीवीच्या चाहत्यांना हे सहन झाले नाही आणि कीर्तीला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली. आता, एक वर्षानंतर, अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान चिरंजीवीच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. माफी मागून आता अभिनेत्रीने चिरंजीवीच्या चाहत्यांकडून दिलासा मिळवला आहे. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘रिव्हॉल्व्हर रिटा’ असे आहे, जो येत्या २८ नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
कीर्ती काय म्हणाली?
कीर्ती सुरेशने साऊथ मेगास्टार चिरंजीवीचे कौतुक करताना म्हटले, “चिरंजीवी सरांना माहित आहे की मी त्यांची मोठी चाहती आहे. ते नेहमी मला माझ्या आवडत्या अभिनेत्यांबद्दल, डान्सरबद्दल आणि चित्रपटांबद्दल विचारत राहतात. जरी मी त्यांचे नाव घेतले नाही तरी त्यांना जास्त वाईट वाटणार नाही. ते मला नेहमी पाठिंबा देत राहतील. जर त्यांचे चाहते या विधानामुळे नाराज झाले असतील तर मी त्यांची मनापासून माफी मागते. माझा त्यांची मने दुखवण्याचा कोणता हेतू नव्हता. मी चिरंजीवीपेक्षा विजय सरांना जास्त पाहिले आहे आणि म्हणूनच मी लगेच त्यांचे नाव घेतले आहे. दोघेही एकमेकांपेक्षा कमी दर्जाचे नाहीत आणि दोघेही दिग्गज आहेत. जर कोणाला अजूनही नाराजगी वाटली असेल तर मला माफ करा.” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.
साऊथ अभिनेत्रीचा आगामी चित्रपट ‘रिव्हॉल्व्हर रीटा’ २८ नोव्हेंबर रोजी तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटासाठी खूप प्रमोशन निर्मात्यांनी केलेले नाही, परंतु असे मानले जाते की जर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर तो चमत्कार करू शकतो. कीर्तीकडे सध्या कोणतेही मोठे प्रोजेक्ट नाहीत. परंतु यावेळीही ती कल्की २८९८ एडीचा भाग असण्याची शक्यता आहे. कारण सर्वत्र याचीच चर्चा आहे.