(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःख डोंगर कोसळला आणि चाहते अजूनही या धक्क्याने हादरले आहेत. अभिनेत्याची दुसरी पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी देखील खूप दुःखी आहे. आता, त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी, त्यांनी धरमजींची आठवण काढून त्यांच्यासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. आणि सोबतच त्यांनी भावुक नोट देखील लिहिली आहे. तिने त्यांच्या एकत्र घालवलेल्या आठवणींना उजाळा देणारे अनेक फोटो देखील शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
नवऱ्याच्या जाण्याने हेमा मालिनी खूप दुःखी झाल्या आहेत. त्यांनी पोस्ट शेअर करताना लिहिले की, ” ‘धरमजी…हे माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत. एक प्रेमळ पती, आमच्या दोन्ही मुलींचे ईशा आणि अहानाचे एक प्रेमळ वडील, एक मित्र, एक तत्वज्ञानी, एक मार्गदर्शक, एक कवी, मला गरज असेल तेव्हा वेळोवेळी नेहमीच माझ्यासाठी उभा असणारा ‘माणूस’. खरं तर, ते माझ्यासाठी सर्वकाही होते. माझ्या चांगल्या आणि वाईट काळात त्यांनी नेहमीच मला साथ दिली आहे. त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे ते माझ्या कुटुंबाशी सहजपणे जवळीक साधत असे. त्यांनी त्या सर्वांमध्ये प्रेम आणि रस दाखवला आहे.” असे अभिनेत्रीने लिहिले आहे.
Dharam ji❤️
He was many things to me. Loving Husband, adoring Father of our two girls, Esha & Ahaana, Friend, Philosopher, Guide, Poet, my ‘go to’ person in all times of need – in fact, he was everything to me! And always has been through good times and bad. He endeared himself… pic.twitter.com/WVyncqlxK5 — Hema Malini (@dreamgirlhema) November 27, 2025
हेमा यांनी धरमजींच्या लोकप्रियतेबद्दल काय लिहिले?
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या लोकप्रियतेचे वर्णन करताना पुढे लिहिले, “एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून, त्यांची प्रतिभा, लोकप्रियता असूनही त्यांची नम्रता आणि त्यांचे सार्वत्रिक आकर्षण यामुळे ते सर्व दिग्गजांमध्ये वेगळे दिसणारे एक अद्वितीय आयकॉन बनले आहते. त्यांची कीर्ती आणि यश चित्रपट उद्योगात कायम राहील. माझे वैयक्तिक नुकसान अवर्णनीय आहे आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी माझ्या आयुष्यभर माझ्यासोबत राहील. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर, आता माझ्याकडे त्या खास क्षणांना पुन्हा जिवंत करण्यासाठी अनेक आठवणी आहेत.” असे लिहून अभिनेत्री भावुक होताना दिसली आहे.
Orry ची साडे सात तास चौकशी, 252 कोटींचा ड्रग्ज घोटाळा प्रकरण; असमाधानकारक उत्तर दिल्याची माहिती
व्यावसायिक आणि वैयक्तिक आघाडीवर एक सुपरहिट कपल
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही आघाड्यांवर एक सुपरहिट जोडी नेहमीच राहणार आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अहवालांनुसार ते सुमारे ३५ चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दिसले आहे, त्यापैकी बरेच यशस्वी चित्रपट ठरले आहेत. आता, धरमजींच्या जाण्याने, हेमा मालिनी यांना जास्त दुःख झाले आहे.






